shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंच दिनदर्शिकेचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रकाशन..!!

पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंच दिनदर्शिकेचे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते प्रकाशन..!!
 इंदापूर प्रतिनिधी: (दि.२१ जाने.२१)समान काम, समान हेतूने व  एकल शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या पुणे जिल्हा एकल शिक्षक सेवा मंचाने संघटनेचे कार्य सर्वसामान्य सभासदापर्यत पोहोचवणे संघटन मजबूत करण्यासाठी दिनदर्शिका तयार करून त्याचे प्रकाशन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते कर्जत  जि.अहमदनगर या ठिकाणी श्रीराम मंगल कार्यालयात(दि.१९) संपन्न झाले.
 आमदार रोहित पवार यांनी एकल शिक्षक सेवा मंचाच्या कामाचे कौतुक केले.या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
 प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषद चे समाज कल्याण सभापती परिहार साहेब , कर्जत पंचायत समितीचे सभापती कानगुडे साहेब  ,एकल सेवा मंचाचे राज्यध्यक्ष  लक्ष्मणराव नरसाळे , राज्य मार्गदर्शक राजेंद्र गरुड, राज्य महिला प्रतिनिधी वृषाली भंडारी, राज्य  सरचिटणीस प्रवीण शेरकर. पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष दादाभाऊ खेसे ,  कोषाध्यक्ष वाघोले , उपाध्यक्ष सुरेश राजगुरू , पुणे जिल्हा महिला अध्यक्ष पल्लवी गायकवाड, कार्याध्यक्षा महिला मनीषा ननावरे,विकास उचाळे,शरद मचाले ,  बारामती तालुका अध्यक्ष दत्तात्रय भोसले, कोषाध्यक्ष  सुरेश देडे , शरद बारवकर , सोनवलकर सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुरेश राजगुरू यांनी केले आणि  आभार शरद मचाले  यांनी मानले.

पुणे जिल्हा एकल सेवा मंच च्या दिनदर्शिका या उपक्रमास इंदापूर तालुक्या सह सर्व तालुक्यातील एकल शिक्षक वृंदानी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले.  अशी माहिती  इंदापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख भारत ननवरे यांनी दिली.
close