ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी भोडणी गावचे नामदेव पवार यांची निवड..!!
इंदापूर प्रतिनिधी: (२१ जाने.२१) भोडणी (ता. इंदापूर) येथील नामदेव सदाशिव पवार यांची महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी४५११ च्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी राज्याध्यक्ष विलास कुमारवर यांनी (दि.२०)निवड केली.
नामदेव पवार हे इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात न्याय मिळवण्यासाठी आपले योगदान वेगवेगळ्या पद्धतीने देतआपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक प्रश्न व मागण्या यांचा पाठपुरावा करून मिळवण्यात यश संपादन करणारे नामदेव पवार यांची महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन यांच्यावतीने दखल घेत त्यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या तालुका भोर जिल्हा पुणे च्या वतीने ब तालुका मेळावा ग्रामपंचायत सभागृह नेरे याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमा प्रसंगी राज्याचे अध्यक्ष विलास कुमरवर, राज्य सचिव गिरिष दाभडकर, कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, उपाध्यक्ष संपत तांबे, दिलीप जाधव तसेच हवेली, आंबेगाव, इंदापूर, पुरंदर, सासवड, बारामती, जुन्नर, शिरूर या तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी येथे उपस्थित होते
यावेळी राज्याध्यक्ष कुमरवर म्हणाले की, नामदेव पवार यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे कार्य अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून कर्मचारी यांचे अनेक प्रलंबित प्रश्न व मागण्यांना न्याय मिळण्यास हातभार लागणार असल्याचे मत त्यांनी याठिकाणी केले व निवड झालेल्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. नामदेव पवार यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी व चाहत्यांकडून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन होत असल्याचे दिसून येत आहे.

