shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देशातील सरपंचाना विधानपरीषद व राज्यसभेवर प्रतिनिधित्व द्या-लक्ष्मण सरवदे..!!

हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.३०,देशातील सरपंचाना विधानपरीषद व राज्यसभेवर शिक्षक व पदविधर मतदारसंघाप्रमाणे सरपंचाना देखील प्रतिनिधीत्व देण्यात यावे या मागणीचे निवेदन शिव सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण साहेब सरवदे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व भारताचे महामहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्याकडे केली आहे.


शिव सरपंच सेवा संघाचे कार्य हे संपूर्ण भारतात असुन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या भारतीय संविधानामध्ये कलम ७३ व कलम ७४ प्रमाणे सरपंचाना विधानपरीषदेवर व राज्यसभेवर(सरपंचाना प्रतिनीधीत्व)शिक्षक व पदविधर मतदार संघाप्रमाणे सरपंचाना देखील त्या संख्येच्या प्रमाणात विधानपरीषद व राज्यसभेवर मा.राष्ट्रपती,मा.राज्यपाल यांच्या अधिकाराने नियुक्ती करण्यात यावी असे निवेदन मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना दि.२७ जानेवारी रोजी देण्यात आले आहे.विनंतीपुर्वक विचार न केल्यास सर्वोच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात येईल असा इशारा देखील शिव सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मण साहेब सरवदे यांनी दिला आहे.
close