अकरा महिला शिक्षकांचा सन्मान करून सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी..!!
इंदापूर प्रतिनिधी:(४ जाने.२१) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर सरकारने यावर्षी पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी करण्याचे ठरवले आहे. जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी आज तालुक्यातील अकरा महिला शिक्षकांचा सन्मान करून त्यांचा गौरव केला.
अंकिता पाटील म्हणाल्या की,' महात्मा जोतीराव फुले आणि त्यांच्या पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजकल्याणासाठी फार मोलाचे कार्य केले आहे. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. त्यांच्या जयंतीच्या पार्श्वभुमीवर सरकारने यावर्षी पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून साजरी करण्याचे ठरवले आहे. प्रथम या निर्णयाचे मी स्वागत करते. ३ जानेवारी महिला शिक्षण दिन म्हणून सर्वांना परिचित व्हावा व महिला शिक्षक करत असलेल्या कार्याचा गौरव व्हावा या करीता आज प्राथमिक स्वरूपात इंदापूर तालुक्यातील ११ महिला शिक्षकांचा सन्मान केला व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.'

