shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी प्रमाणे परिसरातही मांजा विक्री करणार्‍यावर कडक कारवाई होण्याची गरज..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी) :
  घातक असणारा मांज्याला शासनाने बंदी केली असतानाही मांज्याची गुपचुप विक्री होत असल्याने व ह्या मांज्यामुळे अनेक पशु-पक्षी तसेच मोटरसायकल व इतर नागरिकांचेही छोटे-मोठे अपघात होत आहेत.त्यामुळे शिर्डी पोलिसांनी तत्पर मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून शिर्डीमध्ये मांजा विक्री करणारे, मांजाचा दोरा वापरून पतंग उडवणारे यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली असुन त्यामुळे शिर्डी पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 मकर संक्रांत जवळ येऊ लागली की पतंग उडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असतात. शहरासह ग्रामीण भागातही आता मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र पतंग उडवताना त्याला साधा दोरा न वापरतां मांजाचा दोरा वापरला जातो. पतंगाची काटाकाटी करण्यासाठी मांजा वापरला जातो. मात्र पतंग तुटल्यानंतर हा मांजा रस्त्यावर, झाडावर कुठे पडतो. त्यामुळे या मांजाच्या धारी मुळे अनेक पक्षी जखमी होतात, अनेक मोटर सायकल चालवताना अपघात घडतात. यामुळे या मांजावर शासनाने विक्रीसाठी तसेच  मांजा चा दोरा लावून पतंग उडवण्यासाठी बंदी केली आहे. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात मांजाची विक्री होत आहे. 

मांजा दोरा वापरुन मोठ्या प्रमाणात पतंग उडविले जात आहेत. सध्या हे प्रकार मकर संक्रांत जवळ येऊ लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत व छोट्या-मोठे अपघातही होत आहेत. शिर्डीत श्री साई दर्शनासाठी साईभक्त ही मोठ्या प्रमाणात येत असतात.येथे नेहमी गर्दी असते. अशा वेळी साईभक्तांनाही या मांजाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या मांजा विक्रीसाठी व मांजचा दोरा वापरून पतंग उडवणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी साईभक्त ,शिर्डीकर यांनी केली होती. या मागणीनुसार शिर्डी पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 शिर्डीतील लक्ष्मीनगर भागातून सुमारे एक हजार रुपयाचा मांजा जप्त करण्यात आला असून मांजा विक्री करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांचे कौतुक होत आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की ,शिर्डी पोलीस स्टेशन ला खबर मिळाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिसांनी पथक नेमून लक्ष्मीनगर भागात छापा टाकला असता लक्ष्मीनगर भागातील सलमान श्यामल मनियार (वय 20) राहणार लक्ष्मीनगर शिर्डी यास लक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ गल्लीत मांजा विक्री करताना प्रत्यक्ष आढळल्यानंतर त्याच्याकडून 600 रुपये किमतीचा कृतीम रंग लावलेला प्लास्टिक चक्री मध्ये गुंडाळलेला केशरी रंगाचा मांजा ,तसेच दोनशे रुपये किमतीचा लाकडी चक्री मध्ये गुंडाळलेला केशरी रंगाचा मांजा ,त्याचप्रमाणे तिसऱ्या चक्री मध्ये 200 रुपये किमतीचा गुढांळलेला आकाशी रंगाचा माजां जप्त करण्यात आला आहे.

आरोपी मनियार याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि कलम 188 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5 प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक 
प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

 शिर्डी मध्ये मांजाची गुपचूप विक्री होत असल्याने शिर्डी पोलिसांनी कंबर कसली असून मांजा विक्री करणारे, माजांचा दोरा वापरून पतंग उडवणारे यांवर कारवाई होत आहे. त्यामुळे आता शिर्डीमध्ये मांजा विक्री करणारे व मांज्याने पतंग उडवणारे यांच्यावर कारवाई होणार असल्यामुळे शिर्डीत मांजाला नक्कीच आळा बसणार आहे. शिर्डी प्रमाणे परिसरातही गावांमध्ये मांजा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे तेव्हा परिसरातही अशीच कारवाई पोलिसांनी करावी.अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

close