शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब ठाकरे युवा सेना प्रमुख नामदार पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्यसाहेब ठाकरे नगर विकास मंत्री एकनाथ भाई शिंदे कृषी मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांचे लाडके पुणतांबा येथील बाल शिवसैनिक चिरंजीव उत्कर्ष महेश कुलकर्णी यांनी यांनी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याचा वाढदिवस पुणतांबा येथे गोदावरी तिरी श्री क्षेत्र दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या पवित्र भूमीत मुक्ताई माता ज्ञान विद्यापीठ मंदिर आश्रमात व जवळच असलेले ऊस तोड कामगार यांच्या स्थळावर बालगोपाळांना बिस्कीट पुढे खाऊचे वाटप करून मोठ्या आनंदात आपला वाढदिवस साजरा केला.
याप्रसंगी मुक्ताई माता ज्ञानपीठ मंदिर येथे बाल संन्याशी निष्काम कर्मयोगी निस्वार्थ सेवाभावी कार्य करणारे ह भ प रामशास्त्री महाराज यांचे अनुयायी यांचा शाल श्रीफळ देऊन बजरंग दलाचे तालुकाप्रमुख संदीप वहाडणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी पुणतांबा शिवसेनेचे शहर प्रमुख महेश कुलकर्णी शिवसेना महिला आघाडी सौ चित्रा कुलकर्णी युवती सेनेच्या कुमारी नेहा महेश कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक सिताराम पाटील भुसाळ बाल शिवसेनेचे चिरंजीव उत्कर्ष महेश कुलकर्णी अनिकेत वहाडणे रोहित कुलकर्णी राहुल कुलकर्णी यांच्यासह साजरा केला त्याच्या या बालवयातच आदर्श शिवसेनेच्या विचाराचा समाजातून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

