shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निकालाचे ठिकाणी गर्दी करू नका प्रशासनाचे आवाहन..! CRPC 144 कलम करण्यात आले आहे जारी..!!

रिपोर्टिंग टाईम
 राऊंड वन मधील पंधरा गावे साडेसात वाजता.
 राऊंड टू मधील पंधरा गावे साडेआठ वाजता.
 राऊंड थ्री मधील 15 गावे साडेनऊ वाजता.
 राऊंड फोर मधील 11 गावे साडेदहा वाजता.

नगर तालुका मतमोजणी ठिकाण डाॅ. ना.ज. पाऊलबुदे विद्यालय, सावेडी,अहमदनगर .

नगर ।  प्रतिनिधी( शिवा म्हस्के):
अहमदनगर जिल्ह्यामधील दि.१५ जानेवारी रोजी ७०५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत.राज्य निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार दि.१८ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे.

त्या सर्व तालुक्यांतील तहसीलदार यांनी आपल्या आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी ठिकाण व वेळेचे  नियोजन जाहीर केलेले असून व त्या ठिकाणाला मा.जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.
मतमोजणी  ठिकाणे खालीलप्रमाणे 
ती खालील प्रमाणे  दि.१८ जानेवारी पर्यंत कलम १४४ लागु करण्यात आलेला आहे. पाच पेक्षा व्यक्ती किंवा समुह एकत्र ऐकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.आणि  निकाला नंतर मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे.

संबधित उमेदवारांनी या नियमा कडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. 

तसेच नागरिकांनी गावातील निकाल  प्रसार माध्यमांच्या माध्यमातून घरीच ऐका हि विनंती प्रशासनाने केली आहे.
close