जळगाव जिल्हा प्रतिनिधी । एरंडोल प्रमोद चौधरी:
जिल्ह्यात पुन्हा कोरणा च्या प्रादुर्भाव वाढल्याने माननीय जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांच्या आदेशान्वये आज नगर परिषद व पोलीस स्टेशन एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमानाने कारवाई सुरू केली .यामध्ये लग्न समारंभाच्या ठिकाणी गर्दी असल्याने दंडात्मक कारवाई केली तसेच मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत रुपये 16000 दंड वसूल केला आहे.
एरंडोल नगर परिषद मुख्य अधिकारी श्री किरण देशमुख पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर जाधव ए पीआय श्री तुषार देवरे एस सी श्री विलास पाटील पोलीस नाईक श्री विलास खैरनार एच सी श्री संतोष चौधरी अतिक्रमण प्रमुख श्री विनोद कुमार पाटील श्री एस आर ठाकूर श्री राहुल ठाकूर या पथकाने कारवाई केली
व्यापारी व नागरिकांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी कोरोना संदर्भात शासनाने आदेशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान मुख्य अधिकारी श्री किरण देशमुख पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर जाधव साहेब यांनी केले आहे.

