shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाभुळगाव येथे शिवजयंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी..!!

बाभुळगाव येथे शिवजयंती  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  विविध सामाजिक उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी..!!
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील बाभुळगांव या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबवले जात असून गावातील नागरिक नेहमी सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण पूरक  क्षेत्रात नेहमी सतत कार्यरत असतात . या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  विविध सामाजिक उपक्रमाद्वारे  करण्याचे आयोजन केले होते. यामध्ये युवा नेते अमोलराजे इंगळे मित्र परिवार व नारायण असबे ,अजय टीपाले ,गोविंद जगताप ,प्रदीप टिपाले ,यांच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना संक्रमण होणार नाही याबाबतची पुर्ण काळजी घेऊन हा उत्सव साजरा करण्यात आला.
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार (दि. १८ फेब्रु.२०२१) रोजी सायंकाळी शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन युवा नेते महेंद्र रेडके यांच्या शुभहस्ते करण्यात आले .व त्यांच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले.  यानंतर शिवव्याख्याते भारत फलफले यांचे व्याख्यान झाले.
 तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवार( दि. १९ फेब्रु. ) रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांच्या हस्ते करण्यात आले .यानंतर सूर्यकांत चव्हाण यांचा जादूचा प्रयोग सादर करण्यात आला. तसेच शिवचरित्रकार ह .भ. प .सौ .रुक्मिणी ताई ढोणे जालना यांचे कीर्तन याठिकाणी झाले. यानंतर नापास कट्टा व शेतकरी जगाचा पोशिंदा या दोन्हीही वेब सिरीजचे  सर्व कलाकार यांचा सत्कार संपन्न झाला .यानंतर गावातील   छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती च्या निमित्ताने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दीडशे महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम याठिकाणी संपन्न झाला .त्यानंतर शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर मुला मुलींचे मनोगत  व्यक्त करण्यात आले त्यामध्ये  स्नेहा इंगळे ,अंकिता इंगळे ,प्रणव असबे, निकीता कानगुडे यांचा सहभाग होता.
याप्रसंगी गावातील मान्यवर राजाभाऊ इंगळे ,विजय देवकर ,तात्यासाहेब देवकर ,पोपट भोसले, सोमनाथ जावळे ,दिनेश वायकर, अनिल चव्हाण ,भारत यादव ,दादा यादव, गजेंद्र मोरे ,विठ्ठल मोरे ,भगवान मोरे ,रामभाऊ गुजर, दीपक मोरे ,हरिभाऊ गुरगुडे, श्रीकांत गलांडे ,पांडुरंग टिपाले, भारत माणिक आसबे, दशरथ कदम ,नागनाथ भोसले, तात्या हजारे, दशरथ देवकर, अमोल गुरगुडे इत्यादी उपस्थित होते.
 बाभूळगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सामाजिक उपक्रमाद्वारे साजरी करून अनोखा आदर्श निर्माण करण्याचे कार्य आयोजक यांच्या माध्यमातून करण्यात आले .या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला खरी मानवंदना ठरेल असा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे . अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेमध्ये सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होत असून या सामाजिक कार्यक्रमाची नागरिकांमध्ये विशेष चर्चा  दिसून  येत होती. 
या कार्यक्रमास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले असून गेली चार वर्षापासून असे सामाजिक उपक्रमातून शिवजयंती साजरी करीत असल्याचे युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश इंगळे यांनी केले.
close