सोनई - मुळा कारखाना गट आफिस लगत असलेल्या गाडी यार्ड मधील तोडणी कामगार असलेले अविनाश दादाहरी सावंत यांची झोपडी त्यांचे सासरे साहेबराव भिमराव शिंदे या त्यांच्या सासर्याने दि. 18 रोजी रात्री 1:30 च्या सुमारास पेटवुन दिले.
याबाबत पोलिस सुत्रांकडुन समजलेली माहीती अशी की, अविनाश दादाहरी सावंत हे मुळा कारखाना गट ऑफिस जवळ मुळा कारखान्याच्या मालकिच्या जागेत झोपडी टाकुन राहत होते. या झोपडीत त्याची आई कलाबाई व वडील दादाहरी असे एकत्र राहत होते.
माझी पत्नी डिलेव्हरीसाठी माहेरी सोनई खरवंडी रोड येथे गेली असता, मी व माझी आई पत्नीस डीलेव्हरी झाल्यास भेटण्यास गेलो असता, मी पत्नीबरोबर बोलत असतांना सासरे साहेबराव मेव्हणा बालु साहेबराव शिंदे हे दोघे माझ्याजवळ येऊन म्हणाले इतक्या दिवस कोठे होता.
बायकोला भेटायला आत्ता सुचले तसेच मारहाण करुन दमदाटी केली. व म्हणाले आज रात्री तुला दाखवतो, तो इथे कसा राहतो ते पाहतो. माझ्या आईने मध्यस्ती करुन भांडण सोडविले. परत आम्ही मुळा कारखाना येथिल झोपडीत आलो. आम्ही दि. 18 रोजी रात्री जेवण करुन झोपडीबाहेरील मोकळ्या जागेत झोपलो असता. रात्री 1 ते 1:30 च्या सुामरास आम्ही गाढ झोपेत असतांना अचानक मला जाग आली. झोपडीच्या पाठीमागुन आग लागलेली दिसली. त्यानंतर माझी आई व वडील जागे झाले. इतर लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. बाजुस शोधाशोध घेत असतांना माझे सासरे व मेव्हणा हे दोघे पळतांना दिसले. आम्ही आरडाओरड केली असता, ते मोटारसायकलवर बसुन पळुन गेले. शेजारी राहणार्या शिवाजी राजाराम शिंदे व इतर उस तोड कामगारांनी आग विझवण्यास प्रयत्न केले. दरम्यान मुळा करखान्याची अग्निक्षामक घटनास्थळी दाखल झाली, व आग विजविण्यात आली.
अविनाश दादाहरी सावंत यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात भादवी कलम 436, 323, 504, 506 या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास स.पो. नि. रामचंद्र कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्सटेबल प्रविण आव्हाड हे करत आहेत.

