shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबामंदिर आता सकाळी 6 ते रात्री नऊ वाजेपर्यंतच दर्शनासाठी साईभक्तांना राहणार खुले!

सावळीविहीर (प्रतिनिधी) :
 कोरोनाचा राज्यात व जिल्ह्यात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर साईभक्तांसाठी यापुढे सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार असून दर गुरुवारी साईबाबांची पालखी ही आता यापुढे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी  कान्हुराज बगाटे यांनी जाहीर केले असून साईभक्तांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी म्हटले आहे की ,कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता  शासनाने कोरोणा संदर्भातल्या अटी व शर्तींचे कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ही सूचना व आदेश केले असून त्यानुसार शिर्डी येथील श्री साईबाबांचे मंदिर साईभक्तांसाठी आता सकाळी 6 ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे तसेच श्री साईबाबांची काकड आरती व शेजारती साठी साईभक्तांना प्रवेश राहणार नाही. 

या कालावधीत मात्र कोरोणाच्या अटी व शर्ती राखत साईभक्तांना मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दर गुरुवारी निघणारी श्री साईबाबांची पालखी ही पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे .तसेच शनिवार रविवार व गुरुवार या दिवशी साई भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शिर्डी येथे साई संस्थानने सुरू केलेले बायोमेट्रिक पास केंद्रही बंद ठेवण्यात येणार असून ऑनलाईन दर्शन पास सुरू ठेवण्यात येणार आहे .सण,उत्सवाच्या काळातही हाच नियम वापरण्यात येणार आहे.त्याच प्रमाणे दर्शन सुरु असताना साईभक्तांची साधी आरटीपीसीआर ((  रॅण्डमघेवुन )कोरोना टेस्ट ही करण्यात येणार आहे, 

शनिवार-रविवार गुरुवारी साधारण 200 तर इतर दिवशी दीडशे साईभक्तांची  रॅण्डम घेऊन करून तपासणी करण्यात येणार आहे  तसेच  संस्थान कर्मचाऱ्यांचीही  टप्प्याटप्प्याने करून तपासणी करण्यात येणार आहे प्रसादाला यातही  बैठक व्यवस्था व सुरक्षा संदर्भात करण्याच्या अटी व शर्तीचे पालन करत व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत साई भक्तांनी  त्यासाठी सहकार्य करावे असेही आवाहन कान्हुराज बगाटे यांनी केले आहे. त्यामुळे आता साई भक्तांना सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. असे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी म्हटले आहे.
close