shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा खरे प्रेरक समाजसंत-प्रा.डॉ.आर.जी. पवार . !

प्रतिनिधी । विशाल लोंढे  :
तळेगाव : ” संत गाडगेबाबा आयुष्यभर समाजासाठी चंदनासारखे झिजले.हातात खराटे घेऊन स्वच्छतेचा महामंञ दिला.स्वतः पुढाकार घेऊन हातातल्या गाडग्यातून जमा झालेल्या धनातून गोरगरिबांसाठी धर्मशाळा उभ्या केल्या,अशा महामानवांकडून आपण प्रेरणा घेऊन आपली पुढील वाटचाल केली पाहिजे, कारण ते खरे प्रेरक समाजसंत गाडगेबाबा होत ” असे बहूमोल विचार प्राचार्य डॉ. आर. जी. पवार सर यांनी व्यक्त केले.ते लोकनेते बाळासाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान   महाविद्यालयात जयंती उत्सव कार्यक्रमात बोलत होते.


प्रथमतः संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला प्राचार्य,डॉ. पवार यांनी  पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी
 यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास आहेर, समन्वयक डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. बाळासाहेब लवारे, प्रा.मच्छिन्द्र नेहे व इतर प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेतील  स्वयंसेवक उपस्थित होते. जयंती निम्मित महाविद्यालय परिसरातील स्वछता करण्यात आली.

यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व स्वयंसेवकांनी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले .
close