प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई-सोनई प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आज पल्स पोलिओ अभियाना अंतर्गत सुमारे 6684 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले.
सुमारे 104 टक्के काम झाले.सोनई आरोग्य केंद्रा अंतर्गत या अभियानाला सुरवा झाली 0 ते 5 वयोगटातील बालकांना या पोलिओचा डोस देण्यात आले.सोनई आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका व आशा सेविका यांनी हे बालकांना डोस देण्याचे काम केले.सोनई व परिसरातील महिला आपल्या बालकांना सकाळीच घेवुन आरोग्यकेंद्रात मोठी रांग लावली होती.सर्व बालकांना यावेळी डोस देण्यात देण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले असुन आरोग्यसेविका व आशासेविकाचे आभार व्यक्त करण्यात आले.

