प्रतिनिधी। मोहन शेगर :
सोनई-संत वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठाणच्या वतीने वंजारवाडी ता.नेवासा येथे आयोजित कार्यक्रमात समाजभुषण म्हणुण पदश्री डाॅ.तात्याराव लहाने यांना राज्याचे सामाजिक न्यायमंञी नाम.धनजंय मुंडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थितीत मध्ये हभप.पंढरीनाथ महाराज तांदळे,माजी खा.तुकाराम पाटील गडाख,राज्याचे जलसंधारणमंञी नाम.शंकरराव गडाख यांचे सुपुञ युवकनेते उदयन गडाख आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना डाॅ.पदश्री तात्याराव लहाने म्हणाले नाम.धनंजय मुंडे यांच्याकडुन माणसाला जिव कसा लावावा एखाघाला सांभाळुन कसे घ्यावे याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे.त्यांच्यामुळे मला या सरकारमध्ये शासनस्तरावर अधिकारी म्हणुण चांगले काम करता आले.कोविड टास्क फोर्ससाठी पण शासनाने माझा उपयोग करून घेतला याचा सार्थ अभिमान आहे.उलट मागच्या भाजप सरकारच्या काळात मला खुप ञास सहन करावा लागला अशी जाहिर खंत डाॅ.लहाने यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.
नेमका त्यांच्या निशाना तत्कालिन मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता कि माजी ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे यांच्यावर होता याबाबत मोठी चर्चा रंगली आहे.

