shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आसणारे काकासाहेब मांढरे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन... !!

सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आसणारे काकासाहेब मांढरे यांनी घडविले माणुसकीचे दर्शन... !!
 काकासाहेब मांढरे यांनी दिड महिन्यांपूर्वी हरवलेल्या आजोबांची घडवून दिली नातेवाईकांशी भेट.


इंदापूर: प्रतिनिधी 

दीड महिन्यांपासून घरापासून व आपल्या  नातेवाईकांपासून दुरावलेल्या ८० वर्षीय व्यक्तीला अथक प्रयत्नांनंतर संपर्क साधत हरवलेल्या आजोबांची व नातेवाईकांची भेट घडवून आणली. 
याबाबत सविस्तर घटना अशी की, हिरामण हनुमंत हेलम ( वय वर्षे अंदाजे ८० मु.पो. साकोरा ता. नांदगांव जि. नाशिक) हे त्यांचे पुतणे भारत व गणेश लक्ष्मण हिलम यांच्याबरोबर अनुराज शुगर फॅक्टरी, यवत (ता.दौंड, जि. पुणे) येथे ऊस तोडणी करत होते. त्यांना एकुलता एक मुलगा आहे. परंतु तो दारुच्या अहारी गेल्याने तोही कुठे गेला आहे त्याचा तपास लागत नाही. हिरामण यांना कोणी सांभाळत नसल्याने त्यांचे पुतणे त्यांचा सांभाळ करत होते. परंतु गेले दिड महिन्यांपासून हे आजोबा त्यांच्या कोप्यांवरुन हरवले होते. त्यांच्या पुतण्यांनी त्यांचा तपास आपल्या सर्व नातेवाईकांकडे , गावाकडेही  केला परंतु त्यांना त्यांचा ठावठिकाणा मिळत नव्हता.
. इंदापूर परिसरात सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे पत्रकार काकासाहेब मांढरे ( दैनिक जनप्रवास इंदापूर प्रतिनिधी व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद चे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख) हे 
नेहमीप्रमाणेआपले दैनंदिन कामकाज उरकून सोमवार दि.१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कालठण नं. १ या आपल्या गावाकडे   मोटारसायकलवरुन जात असताना वाटेमध्ये त्यांना

सदर व्यक्ती  कालठण नं. १  या गावाच्या दिशेने चालत जात असताना  त्यांच्या निदर्शनास आले. ताबडतोब काकासाहेब मांढरे यांनी मोटारसायकल थांबवून त्या अनोळखी आजोबाची विचारपूस केली. त्यांचे अंग थरथर कापत होते चालवत नव्हते व त्यांना रात्रीचे दिसण्याचीदेखीत्न अडचण होती रात्रीची वेळ असल्याकारणाने काकासाहेब मांढरे यांनी त्यांना गावी नेले, त्यांनी आजोबांच्या जेवणाची सोय केली. त्यांना कपडे देऊन त्यांना अंथरूण पांघरून देऊन झोपण्याची सोय   केली व  त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ते आजोबा नांदगाव येथील रहिवाशी असल्याचे समजले. दरम्यान काकासाहेब मांढरे यांनी सदरील आजोबांबाबत अधिकची माहिती मिळवण्यासाठी त्यांचा व्हिडीओ काढून संपर्काकरिता स्वतःचा नंबर देवून तो सोशल मिडीयावरती अपलोड केला. तसेच व्हाॅटस् अॅप या सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुप वर तो व्हिडिओ अपलोड केला. त्या आजोबांबतची माहिती गावच्या पोलिस पाटील यांना दिली त्यांनी ही खबर इंदापूर पोलीस स्टेशनला दिली. 

दुसऱ्या दिवशी काकासाहेब मांढरे यांचा पुतण्या चंद्रकांत मांढरे याने सदर व्हिडीओ  नांदगांव पोलिस स्टेशनला पाठवला तेथील अधिकाऱ्याने तो व्हिडीओ त्या भागातील पोलिस पाटील या व्हॉट्स अॅप ग्रुप वरती टाकला. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकाला या हरवलेल्या आजोबांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्या नातेवाईकांनी पत्रकार मांढरे यांच्याशी व त्यांच्या यवत येथे ऊस तोडणी करत असलेल्या त्याच्या नातेवाईकास संपर्क केला. यवत येथे ऊस तोडणी करत असलेल्या आजोबांच्या पुतण्याने मांढरे यांच्याशी संपर्क केला. दुसर्‍या दिवशी बुधवार (दि. १७ ) रोजी दुपारी त्यांचा पुतण्या भारत हिलम मोटारसायकलवरुन त्यांना घेण्याकरिता कालठण येथे आला असता आजोबांना त्याच्या स्वाधीन मांढरे यांनी त्याच्या स्वाधिन केले यावेळी बागायतदार गोरख पाडुळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते

दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आजोबा हे अथक प्रयत्नांनंतर सापडून आल्याने नातेवाईकांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रु आले होते .
close