shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीत श्रद्धा सबुरी बरोबर सुरक्षेचे आचरण होण्यासाठीच श्री साई तीर्थक्षेत्र पर्यटन पोलीस मदत केंद्र ची स्थापना--विशेष पो. महानिरीक्षक डॉ. प्रदीप दिघावकर..!

शिर्डी( प्रतिनिधी):
शिर्डी ही राज्याची अध्यात्मिक राजधानी असून येथे पोलीस दला मार्फत नागरिक व साईभक्तांना अधिकाधिक सुविधा मिळावी म्हणून अधिकाधिक पावले उचलण्यात आली असून येथे त्यासाठीच श्री साई तीर्थक्षेत्र पर्यटन पोलीस मदत केंद्र ची स्थापना करण्यात आली आहे. 

असे सांगत येथील साईबाबा संस्थान व पोलीस दल अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नागरिक व साईभक्तांच्या सुरक्षेसाठी विविध प्रयोग राबवण्यात येणार आहेत. असी माहीती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रदीप दिघावकर यांनी शिर्डी येथे दिली आहे.

 विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रदीप दिघावकर यांनी नुकतीच शिर्डीला भेट दिली असता पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाला सुमारे दोन कोटी साईभक्त येत असतात.या साई भक्तांना व येथील नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे .त्यासाठी येथे पोलीस मदत केंद्र स्थापन करण्यात आले असून या पोलीस मदत केंद्राचे नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी ऑनलाइन उद्घाटन केले आहे.

येथे एक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक व दहा पोलीस जवान कार्यरत राहणार आहेत तसेच कमांडर ही कार्यरत राहणार आहे. पोलीस दला मार्फत श्री साईबाबांच्या श्रद्धा सबुरी बरोबरच सुरक्षालाही महत्त्व देण्यात आले असून येथे श्रद्धा सबुरी व सुरक्षा  त्रि संदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश ,कर्नाटक तामिळनाडू आदी राज्यातील विविध साईभक्त मोठ्या संख्येने येत असतात, त्यांना काही अडचण होऊ नये. भाषाची अडचण येऊ नये म्हणून येथे तामिळी व इतर भाषा येणारे पोलीस मित्रही ठेवण्यात येणार असून त्यामुळे या साईभक्तांची अडचण दूर होणार आहे.

 तरी नागरिकांनी या पोलीस दला ला सहकार्य करावे असे आवाहनही विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर प्रदीप दिघावकर यांनी आज गुरुवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शिर्डीत केले आहे.यावेळी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, डीवायएसपी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे ,वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे ,श्री साईबाबा संस्थान चे सुरक्षा अधिकारी पोलीस निरीक्षक देसले, तसेच इतर पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
close