shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पिंपरी युवासेनेकडून पोलीस अंमलदार श्री. निवास रोकडे ह्यांचा सत्कार..!

पिंपरी चिंचवड:-
भोसरी पोलीस स्टेशन चे पोलीस अंमलदार निवास रोकडे यांची पोलीस उप .निरीक्षक पदी निवड 

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून घेण्यात आलेल्या पोलीस उप निरीक्षक स्पर्धा परीक्षा 2017 चा निकाल नुकताच जाहीर झाला त्यात निवास यांची महाराष्ट्रातुन 55 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कौतुकास्पद कामगिरी केली आहे .कोरोना काळात खडतर सेवा करून सुद्धा  मैदानी चाचणीची  तयारी करून घवघवीत यश संपादीत केले.

मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा  तालुक्यातील साडे या छोट्याश्या गावातील हा तरुण नवी मुबंई पोलीस दलात भरती 2010 मध्ये पोलीस भरती झाला 2019 मध्ये चिंचवड पोलीस आयुक्तालय झाले तेव्हा बदलून ते भोसरी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.त्यांच्या यशा बददल त्यांचा सत्कार पिंपरी युवा सेने च्या वतीने करण्यात आला.

यावेळी पिंपरी युवासेनेचे निलेश हाके, पोलीस नाईक रवींद्र जाधव, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भुरे, मैत्री ग्रुप चे रवी कांबळे, अविनाश जाधव, अक्षयदादा गायकवाड, दीपक साळवे, रोहित गोरे उपस्थित होते.
close