shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शिवारफेरी योजने अंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष शेतामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन..!!

कर्मयोगी शिवारफेरी योजने अंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष शेतामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन..!!

कर्मयोगी कारखान्याच्या वतीने"कर्मयोगी शिवार फेरी"या उपक्रमाचे आयोजन ..!!

इंदापूर प्रतिनिधी: कर्मयोगी सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने"कर्मयोगी शिवार फेरी"
योजनेअंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष शेतीत  जावुन शेतक-यांच्या अडीअडचणी समजुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चालू करून
कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखाना तयार करीत असलेल्या सेंद्रिय खताचा वापर कार्यक्षेञातील शेतकरी त्याचा वापर करीत असल्याने ऊसपिक जोमदार  असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक  बाजीराव सुतार यांनी दिली.  कालठण नं. २ येथील प्रगतशिल शेतकरी सुदाम चंद्रभान पाडुळे यांनी को.सी. ८६०३२ या ऊस पिकासाठी कर्मयोगीचे सेंद्रिय खत वापरल्याने तसेच पडस्थळ, पिंपरी या भागातील प्लॉटची पाहणी या प्रसंगी करण्यात आली. या भागातील बहुतांश शेतकरी रासायनिक खतांचा अत्यल्प वापर करुन सेंद्रिय खतांचा मुबलक प्रमाणात वापर करीत असल्याचे शेतकरी  सुदाम पाडुळे यांनी आवर्जुन सांगितले.

प्रत्यक्ष शेती क्षेत्रात जाऊन शेतक-यांना माहिती देताना कारखान्याचे कार्यकारी संचालक  बाजीराव सुतार म्हणाले, कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धन पाटील व व्हाईस चेअरमन श्रीमती पद्माताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट अशा सेंद्रिय व जैविक खताचे उत्पादन सुरु असून दिवसेंदिवस यास सभासदांचा प्रतिसाद वाढत आहे. “कर्मयोगी शिवार फेरी” योजनेअंतर्गत कारखान्याने विविध भागातील सभासदांच्या प्रत्यक्ष शेतीत  जावुन शेतक-यांच्या अडीअडचणी समजुन घेवून त्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम चालू केलेला आहे. 
तसेच सभासदांनी मातीपरीक्षण तसेच जास्तीत जास्त सेंद्रिय व जैविक खते वापरण्याबाबत आवाहन केले आहे. पर्यावरण व्यवस्थापक यांनी जमिनीचा कर्ब व सेंद्रिय खतांचे महत्व या विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी एस.जी.कदम, ऊसविकास अधिकारी गणेश पोळ, पर्यावरण व्यवस्थापक जे.व्ही.माने व कालठण भागातील विलास साहेबराव पाडुळे, सुनिल रामदास जगताप, गणेश गोविंद मेंगडे, राहूल लालासो जगताप, वर्षल मोहन पाडुळे, हारुन अब्दुल मुलाणी, आदिकराव भिमराव रेडके, संतोष बबन जगताप हे शेतकरी उपस्थित होते. सर्व उपस्थित ऊस उत्पादक सभासदांनी “कर्मयोगी शिवार फेरीचे” आभार व्यक्त केले व ही बाब कौतुकास्पद असलेचे नमूद केले.
close