shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना लि. महात्माफुलेनगर बिजवडी या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर .. २७ मार्चला होणार मतदान..!!

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना लि. महात्मा फुलेनगर बिजवडी या कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर .. २७ मार्चला होणार मतदान..!!
इंदापूर प्रतिनिधी:कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना. लि. महात्मा फुलेनगर बिजवडी या सहकारी संस्थेची  संचालक मंडळ निवडणूक लागली असून  इंदापूर तालुक्यातील या कारखान्याचा सन २०२१ ते २०२६ पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम(दि. २२ फेब्रु.२१) रोजी जाहिर झाला आहे.

या निवडणूक प्रक्रियेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दिनांक २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२१ असा असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात दाखल करण्याची वेळ आहे. नामनिर्देश पत्राची छाणनी प्रक्रिया २ मार्च रोजी सकाळी ११ वाजलेपासून छाणनी संपेपर्यंत होणार आहे.अर्ज माघारी घेण्याची मुदत ३ मार्च ते १७ मार्च २०२१ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या निर्धारीत वेळेत असणार आहे.तर दि. २७ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजलेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.मतदान प्रक्रियेनंतर  दि.२८ रोजी मतमोजणी पार पडेल.

कर्मयोगी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्याने इच्छुक कोणकोणते उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले जातात याकडे कर्मयोगी साखर कारखान्याच्या सभासदांचे लक्ष राहणार आहे.  कारखान्याच्या स्थापनेपासून कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या ताब्यात असणारा कारखाना आज त्यांचे पुतणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे चेअरमन पदी आहेत तर त्यांची मुलगी श्रीमती पद्माताई भोसले ह्या व्हाईस चेअरमन पदी आहेत.  आता निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली असून कारखान्याच्या निवडणुकीमध्ये राजकीय रंग कशा पद्धतीने तयार होईल. याकडे इंदापूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.
close