सावळीविहीर । प्रतिनिधी :
नगर मनमाड महामार्गावर सावळीविहीर बुद्रुक येथील लक्ष्मी वाडीवर मोटरसायकल व माल ट्रक यांच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून एक एक तरुणीही जखमी झाली आहे.हा अपघात मंगळवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी घडला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की नगर-मनमाड महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत .या खड्ड्यांमुळे अनेक मोटर सायकली स्लिप होऊन अपघात होत आहेत .असाच एक अपघात आज परत सावळीविहीर येथील लक्ष्मीवाडी परिसरात घडला आहे. कोपरगाव कडून शिर्डी कडे रोशन राजेश गुजर (रा.कालिका नगर शिर्डी )हे आपल्या मोटरसायकलीवर आपल्या बहिणीला घेऊन शिर्डीकडे जात होते.त्यांच्या मोटर सायकल वर भाजीपाला व गहू बांधलेले होते. ते शिर्डी कडे जात असताना लक्ष्मीवाडी येथील रस्त्याच्या कडेलाच खड्डे असल्यामुळे त्यांची मोटर सायकल नंबर एम एच 17BK 8132 स्लिप झाली व ते खाली पडताच बाजूने जाणाऱ्या ट्रक नंबर RJ 14GJ 2687 या ट्रकच्या मागच्या टायर खाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मात्र त्यांची बहीण विरुद्ध दिशेला पडल्यामुळे ती वाचली आहे. या अपघातात मोटरसायकल वरील रोशन राजेश गुजर राहणार शिर्डी हे जागीच ठार झाल्यामुळे शिर्डी व परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताची खबर मिळताच शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मालट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे .गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून अधिक तपास शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.

