यावेळी संप काळात कुठेही बोरवेल गाडी आढळून आल्यास बोरवेल व्यावसायिक असोसिएशनच्या वतीने ५० हजार रुपये दंड आकारण्यात येईल तरी सर्व बोरवेल गाडी मालकांनी याची नोंद घ्यावी. तसेच मोठ्या प्रमाणावर इंधन दरवाढ झाल्याने श्रीरामपूर तालुका राहता राहुरी शिर्डी बोरवेल असोसिएशनच्यावतीने बोरवेल चे दर ठरविण्यात ८० रुपये प्रति फूट ठरविण्यात आले असून क्रेसिंग पाईप अडीचशे रुपये व रीबोर चाळीस रुपये दराप्रमाणे प्रति फुट तसेच कटिंग रेट शंभर रुपये प्रमाणे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
प्रसंगी हरेगाव फाटा येथे सर्व व्यावसायिकांनी निदर्शने करत इंधन दरवाढ संदर्भात निषेध व्यक्त केला आहे. यासंदर्भात शिरसगाव येथील सरपंच श्री आबासाहेब गवारे उपस्थित बोरवेल व्यवसायिक यांना मार्गदर्शन करत नवीन दरवाढ संदर्भात मार्गदर्शन केले.
प्रसंगी श्री अनिल बाराहाते, श्री सागर चौधरी, श्री अमोल चौधरी, श्री गणेश चेडे, श्री प्रविण पाटील, श्री नितीन फलके, श्री योगेश थोरात, श्री अजित कोकाटे, श्री शुभम मखरे श्री शक्ती सेठ श्री नाथा भाऊ शिंदे श्री सतीश सुलताने, श्री शेलागण, श्री बालम शेठ, श्री सतीश मखरे, श्री बाळासाहेब थोरात, श्री नाना भांबारे, श्री सचिन पेचे, श्री अवधूत अहिरे, श्री महेंद्र रेड्डी, श्री नितीन खरात आदी बोरवेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरवेल व्यवसायिक होते.

