shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा..!!

आ. नमिता ताई मुंदडा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर...!! 

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे :-
 
१८ फेब्रुवारी रोजी गुरूवारी मध्यरात्री अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील 

पिकांचे मोठे नुकसान झाले असुन या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी 

अशी मागणी केजच्या आमदार सौ. नमिता ताई मुंदडा यांनी क्रषी मंत्री दादाजी भुसे यांच्या कडे केली आहे. 

 
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील वीडा सर्कल मधील सारूळ, जोला,पिंपळगाव,विडा या गावातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा,  आंबे, टरबूज,खरबुज,डाळींब, फळबागा तसेच भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील काढणीस आलेले पिके भुईसपाट झाली आहेत. 
 २०२० चा खरीप पिक विमा अद्याप आलेला नाही, आघाडी शासनाने सरसकट पिक विमा 

देण्याचे आश्वासन दिले आहे त्याचा त्यांना विसर पडला असुन विमा द्यावा, तालुक्यातील विज ट्रान्सफार्मर बंद केले आहेत
ते तात्काळ चालू करावेत आणि शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ 

शेतक-यांना मदत द्यावी अशी मागणी आमदार सौ. नमिता ताई मुंदडा यांनी क्रषी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या कडे केली आहे. 

यावेळी आमदार यांच्या बांधावरील पाहणी दौऱ्यात अक्षय मुंदडा, केजचे तहसीलदार मेंडके साहेब, तालुका कृषी अधिकारी भगत साहेब, तालुका अध्यक्ष भगवान केदार, विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, सुनील गलांडे, रमाकांत बापू मुंडे, मुरलीधर ढाकणे, सुरज पटाईत, सुनील घोळवे, मच्छिंद्र जोगदंड, शिवाजी पाटील, राहुल गदळे, सुदाम पाटील, फरके अण्णा, सरपंच केशव घोळवे, सारूळ सरपंच संभाजी ढाकणे, रवी नांदे,अतुल इंगळे,  भाजप वैद्यकीय आघाडी बीड जिल्हा प्रमुख वासुदेव नेहरकर व दत्ता धस शेतकरी बबन ढाकणे, सहदेव घोळवे, उद्धव घोळवे, भाऊसाहेब ढाकणे, फुलचंद सारूक, पिंपळगावचे गोविंद घोळवे, क्रष्णा सारूक यांच्या शेतातील बांधावर जाऊन पाहणी केली.                                         
 

वरील दौऱ्यात प्रशासकीय अधिकारी गिरधावर साहेब, विविध गावचे  तलाठी व क्रषी सहाय्यक उपस्थित होते.
close