हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरातील हाँटेल सुरुची येथे दि.०६ फेब्रुवारी शनिवार रोजी दुपारी २ वाजता युवासेनेची आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हिंगोली जिल्हा युवासेना विस्तारक अभिषेक शिर्के यांनी उपस्थित शिवसैनिक व युवासैनिकांना बोलतांना आवाहन केली की,शिवसैनिक व युवासैनिकांनी एकत्रीत येत सेनगाव नगरपंचायत वर शिवसेनेचा भगवा फडकावा.
हिंगोली जिल्हा युवासेना विस्तारक अभिषेक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यात युवासेनेची आढावा बैठक घेण्यात येत आहे.सेनगाव शहरात देखील सेनगाव तालुका युवासेनेची आढावा बैठक घेण्यात आली.या आढावा बैठकीत जिल्हा विस्तारक अभिषेक शिर्के शिवसैनिक व युवासैनिक यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की,शिवसेना,युवासेना हि सर्वसामान्य जनतेच्या व शेतकरी,शेतमजुर यांच्या न्यायासाठी नेहमीच सत्ता असो की नसो रस्त्यावर उतरुन न्याय देण्याचे काम करते याच बळावर शिवसैनिक व युवासैनिकांनी एकत्र येऊन लवकरच होणा-या सेनगांव नगरपंचायत निवडणुकीत एकत्र येऊन सेनगांव नगरपंचायत वर भगवा फडकावा असे आवाहन केले.यावेळी शिवसेनेच्या सेनगांव तालुक्यातील नवनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,युवासेना हिंगोली जिल्हाप्रमुख दिलीप घुगे,बालाजी सवडकर,तालुकाप्रमुख संतोष देवकर,शिवसेना शहरप्रमुख जगन्नाथ देशमुख, हिंगोली युवासेना तालुकाप्रमुख गजानन भोसले,युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रविण महाजन,अनिल अगस्ति,जि.प.सदस्य नंदकीशोर खिल्लारे,सेनगांव युवासेना तालुकाप्रमुख जगदीश गाढवे-पाटील,शहरप्रमुख संतोष गाढवे-पाटील,तालुका प्रसिध्दीप्रमुख विश्वनाथ देशमुख,गणेश रंजवे,भैया जाधव,प्रविण जाधव,माजी पं.स.सदस्य बद्रीनाथ कोटकर,धनाजी गिते,बाबासाहेब राठोड आदींसह शिवसेना,युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

