वडापुरी येथे गणेश जयंती उत्सव संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी:वडापुरी गाव म्हणजे पुण्यभूमी ठाव म्हणून ओळखलं जाणाऱ्या श्री नाथाच्या पावन भूमीत (दि १५ फेब्रु.२१) रोजी अध्यात्मिक ठेवा असणाऱ्या या गावात भक्तिमय वातावरणात आज श्री गणेश जयंती उत्सव श्री नाथ मित्र मंडळ व समस्त ग्रामस्थ वडापुरी यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील लहानथोर सर्व भक्तगण या कार्यक्रमास उपस्थित होते.
या दिवसी सकाळी ७ वाजता श्री गणेश मूर्तीचा अभिषेक नवनाथ बागल व ११ वाजता गणेश मूर्तीचा अभिषेक किशोर बागल यांच्या हस्ते करण्यात आला., तर दुपारी १ ते २ या वेळेत वडापुरी भजनी मंडळ यांच्यावतीने भजनाचा कार्यक्रम करण्यात आला. संध्याकाळी सहा ते सात या वेळेत गावातील भजनी मंडळ आणि परमपूज्य गुरुवर्य दत्तात्रय महाराज सुद्रिक पाटील अध्यात्मिक बालसंस्कार वारकरी शिक्षण संस्थेचे रामायणाचार्य ह. भ .प. रवींद्रनाथ महाराज सुद्रिक-पाटील व त्यांचे शिष्य यांनी अतिशय सुंदर असा" नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी" याप्रमाणे अप्रतिम असा हरिपाठ नाचून गायन करत सादर करण्यात आला. यामध्ये गावातील लहान मोठ्या सर्वांनी सहभाग घेऊन भक्तीमय आनंद घेतला .
यानंतर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीनाथ मित्र मंडळ यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला. कोरोना संक्रमण होऊ नये याची काळजी घेऊन अतिशय शिस्तबद्ध अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . रात्री ९ ते ११ वेळेत गणेश जयंती पर हरिकीर्तन वय वर्ष १४असलेल्या कुमारी ह .भ .प .ऋतुजा ताई इंगळे यांनी अतिशय सुंदर आणि प्रबोधनात्मक संदेश देणारी कीर्तन सादर केले. यामध्ये गायन-वादन कीर्तन साथ सर्व बालसंस्कार केंद्रातील या मुला-मुलींनी केल्यामुळे वडापुरी गावातील ग्रामस्थ त्यांच्याबद्दल अतिशय कौतुक करीत भावमय या कार्यक्रमाचा आनंद घेत असताना दिसत होते.
कार्यक्रम संपल्यानंतर सदर बाल संस्कार वारकरी शिक्षण संस्था व गौशाळा यासाठी फुल नाहीतर फुलाची पाकळी या स्वरूपात समस्त ग्रामस्थ वडापुरी व श्रीनाथ मित्र मंडळ यांच्यावतीने सहकार्य करण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

