shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण कार्यासाठी २१ लाखाचा निधी सन्मानपूर्वक सुपूर्त

श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण कार्यासाठी २१ लाखाचा निधी सन्मानपूर्वक सुपूर्त
    हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार्याने इंदापूर तालुक्यातून  मंदिर उभारणीसाठी मोठे सहकार्य


इंदापूर प्रतिनिधी: (१६ फेब्रु.२१)राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक असलेले अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी इंदापूर तालुक्यातून २१ लाख निधीच्या चेकचे हस्तांतरण राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भाग्यश्री बंगलो येथील कार्यक्रमात संघाच्या मान्यवरांकडे सुपूर्त करण्यात आले.
   या ऐतिहासिक व धार्मिक कार्यास सर्वांची मदत व्हावी या उद्देशाने माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यात विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करून नागरिकांना या ऐतिहासिक कार्यास योगदान देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. २१ लाख रुपये निधीचे यामाध्यमातून संकलन झाले. आज भाग्यश्री बंगलो येथील छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात या निधीचे संघाचे मान्यवर विभागीय संघचालक संभाजीराव गवारे, जिल्हा संघचालक दिलीप शिंदे, प्रांत सदस्य सुनील देशपांडे, प्रांत कार्यकर्ते हेमंतराव हरहरे, व्यवसाय वि. प्रांत मंडळ सदस्य दीपराव पेशवे, जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मासाळ, ज्येष्ठ मार्गदर्शक अतुल तेरखेडकर यांच्याकडे या चेकचे हस्तांतरण करण्यात आले.
   यावेळी भरत शहा, मारुती वणवे, लालासाहेब पवार, देवबा जाधव, शकील सय्यद, कैलास कदम, सत्यशील पाटील, महेंद्र रेडके, पिंटू काळे, बापू जामदार, भाऊसाहेब चोरमले, आबा मोहोळकर, शिवाजी मखरे, सुभाष बोंगाणे, संदिपान कडवळे, विजय खर्चे, जावेद शेख, सचिन जामदार उपस्थित होते.
प्रस्तावना अतुल तेरखेडकर यांनी केली यावेळी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धनज पाटील, हेमंतराव हरहरे यांनी मार्गदर्शन केले. माजी आमदार विजयराव काळे  उपस्थित होते
close