shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवजयंतीची औचित्य साधत केज येथील आदर्श पत्रकार समितीची ननवनिर्वाचित कार्यकरणी जाहीर..!!

आदर्श पत्रकार समितीच्या तालुकाध्यक्षपदी अशोक सोनवणे ; सचिवपदी गौतम बचुटे ,सहसचिव पदी प्रकाश मुंडे तर कार्याध्यक्ष पदी सौ.रत्नमालाताई मुंडे यांची निवड
---------------------------------------
केज,( प्रतिनिधी )
केज येथील आदर्श पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची  जयंती केज येथील शासकीय विश्राम गृह येथे १९ फेब्रुवारी शुक्रवार रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहारअर्पण करून साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचऔचित्य साधून शासकीय विश्राम गृह केज येथे आदर्श पत्रकार संघाची दि.१९  शुक्रवार रोजी नवनिर्वाचित कार्यकरणीही जाहिर करण्यात आली.
कार्यकारणीचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार प्रा. हनुमंत भोसले सर होते, तर  कार्यकारणीला जेष्ठ पत्रकार धनंजय(मामा) देशमुख , जेष्ठ पत्रकार धनंजय कुलकर्णी व आदर्श पत्रकार समितीचे माजी अध्यक्ष विजयराज अरकडे (सर) यांचे मार्गदर्शन लाभले.

 नवीन कार्यकारीणी मध्ये अध्यक्ष म्हणून श्री.अशोकराव सोनवणे यांची तर सचिवपदी गौतम बचुटे,सहसचिव पदी प्रकाश मुंडे,कार्याध्यक्ष पदी सौ.रत्नमालाताई मुंडे व उपाध्यक्षपदी  बाळासाहेब जाधव , महादेव काळे, तर कोषाध्यक्षपदी प्रवीण देशमुख(सर),सह कोषाध्यक्ष अनंत जाधव,संघटक धनंजय घोळवे, सह संघटक जय जोगदंड, सल्लागार हनुमंत भोसले (सर),धनंजय कुलकर्णी,धनंजय (मामा)देशमुख, माजी अध्यक्ष विजयराज आरकडे(सर), सुहास चिद्रवार शिवदास मुंडे , तर सदस्यपदी अमोल जाधव , इनामदार अजिमोद्दीन ,अक्षय बनसोडे, साखरे सर, उत्रेश्वर शिंदे,अक्षय वरपे ,भुजंग इंगोले ,यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या प्रसंगी आदर्श पत्रकार संघाच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 या वेळी पत्रकार विजयराज आरकडे, शिवदास मुंडे, धनंजय देशमुख यांच्यासह आदर्श पत्रकार समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष अशोक सोनवणे, सचिव गौतम बचुटे, कार्याध्यक्ष सौ रत्नमालाताई मुंडे, उपाध्यक्ष महादेव काळे व बाळासाहेब जाधव, संघटक धनंजय घोळवे, कोषाध्यक्ष प्रवीण देशमुख, सहकोषाध्यक्ष जय जोगदंड, यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करून पुढील कार्यभार सोपउन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
close