shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

क्रांतिनगर भागातील सार्वजनिक स्मशान भूमित वीजेची कमतरता..!!

केज नागरपंचयतच्या स्मशानभूमीत लाइट व्यवस्था करा - नागरिकांची मागणी
---------------------------------------
केज /जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :- 
---------------------------------------
केज शहरातील क्रांतिनागर भागातील सार्वजनिक स्मशान भूमित लाइट ची व्यवस्था नसल्यामुळे अंत्यविधि करण्यास अडचन निर्माण होत आहे.

शहरातील यखाद्या कुटुंबातील व्यक्ति काही कारणाने दगावला गेला ,आणि अंत्यविधि करण्यास रात्री उशीर झाला तर या स्मशान भुमीच्या ठिकाणी लाइट ची व्यवस्था असणे गरजेचे आहे, परंतु या स्मशान भूमित कसल्याच प्रकारची लाइट ची व्यवस्था नसल्यामुळे सबंधित नातेवाईकाना अंत्यविधि पार पाडन्यास अडचन होत असून, मोबाइ टॉर्च लाउन अंत्यसंस्कार करण्याची वेळ येत आहे.


ही परिस्थिति पाहता नागरपंचायतने दुर्लक्ष न करता या ठिकाणी लाइट ची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.                               

अंधारात अंत्यसंस्कार करण्याची पाळी येत असल्याने वेळीच लाइटची व्यवस्था सबंधित लोकांनी करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे.
close