शिवबा ..
शाहीरा शब्द पुरेना
शिवबा कविता गाता
सागरां मिळेना तळ
खोलीअथांग मोजता
मेरु पर्वत होई खुजा
राजे उंची तव पाहता
उपकृत अवघे विश्व
खरोखर राजाजाणता
आभाळ झुके खाली
भगवा झेंडा फडकता
क्षितीज देई प्रतिध्वनी
शिवबा नाव धडकता
ताजेचं भासते पुनश्च
ऐकता ती शिव कथा
मुजरा कराया त्वरीत
अवचित झुकतो माथा
कोडे पडले भगवंता
दुजा ना ये बनवता
स्वत: कला कृतीवर
भाळलाअसे विधाता
-हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com

