कोपरगाव : विशाल लोंढे:
अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील मंडलात महसूल विजय सप्तपदी अभियान राबवण्याचे धोरण अवलंबले त्याचाच एक भाग म्हणून कोळपेवाडीत तहसीलदार योगेश चद्रें यांच्या मार्गदर्शनाखाली सप्तपदी अभियान संपन्न झाले यावेळी सुरेगाव मंडलातील ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नेते निवृत्ती कोळपे होते यावेळी सुरेगाव जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते संजीवनी संचालक राजेंद्र कोळपे युवा नेते किरण कोळपे शहाजापुर सरपंच सचिन वाबळे उपसरपंच बाळासाहेब ढोमसे दत्त दिगंबर चेअरमन
राजेंद्र ढोमसे पुंजाराम राऊत डॉ अरुण वैराळ शब्बीर शेख वसंतराव लकडे शामराव वाबळे आदी मान्यवरा सह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
तहसीलदार योगेश चंद्र यांनी शासनाचे सप्तपदी अभियान ग्रामस्था साठी कसे फायद्याचे आहे यातील भूमिका विशारद करतांना सांगितले की मामलेदार न्यायालय अधिनियम १९०६ खाली निर्गत प्रकरणात पोटखराबा वर्ग अ क्षेत्र लागवडीखाली आणने गाव नकाशा वरील वहिवाट पाणंद शेत शिवार रस्ते मोकळे गाव तेथे स्मशान भूमी दफन भूमी करणे तुकडे नियमित करणे महा आवास घरकुल अतिक्रमण नियमित करणे खंडकरी जमीन वाटप यांची सखोल माहिती देत ग्रामस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले.
सरपंच सूर्यभान कोळपे यांनी शासकीय जमिनीवरील झालेली अतिक्रमणे नियमित करण्यासाठी तहसीलदार यांना विनंती केली असता अतिक्रमिन धारकांचे प्रस्ताव ग्रामपंचायत ने सादर केल्यास त्या वरील शासन नाव कमी करून मालकी हक्का मध्ये अतिक्रमण धारकांचे नाव लावून देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले कार्यक्रम यशस्वितेसाठी सुरेगाव मंडल अधीकारी बाबाजी जेडगुले कामगार तलाठी गर्कल जी एम बिन्नर विधाते ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

