आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त औषध विक्रेते व्यावसायिकांना १५ फ्रिज व १४ कॉम्प्युटर वाटप..!!
इंदापूर प्रतिनिधि (तात्याराम पवार) :(दि.२ फेब्रु.२१)इंदापूर येथे अखिल भारतीय औषध विक्री संघटनेचे व महाराष्ट्र राज्य केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे कल्याण-डोंबिवली यांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून इंदापूर तालुक्यातील अतिवृष्टी मध्ये ज्या औषध विक्रेते व्यावसायिकांचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले होते . त्यांना आमदार जगन्नाथ( आप्पा) शिंदे यांच्या आदेशानुसार केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने १५ फ्रिज व १४ कॉम्प्युटर इंदापूर तालुक्यातील नुकसानग्रस्त मेडिकल व्यवसायिकांना इंदापूर तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या हस्ते (दि.१ फेब्रु.)देण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यशील पाटील, सचिव गणेश ठोंबरे,अकबर तांबोळी, सुहास पवार, अनिल पवार, अजित गांधी, गणेश रायते, स्वप्निल शहा, नाना हेगडे, समीर बर्गे, शितल बोरा इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सत्यशील पाटील म्हणाले की,इंदापूर तालुक्यात दिनांक १४ ऑक्टोबर २०२१ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यामध्ये निमगाव केतकी ,इंदापूर, लासुरणे, लोणी देवकर आणि भिगवण येथील केमिस्ट बांधवांच्या दुकानामध्ये पावसाच्या पाण्याने खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सदर नुकसानीची पाहणी महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी तसेच पुणे जिल्हा केमिस्ट असो. चे अध्यक्ष, सचिव आणि इंदापूर तालुका कार्यकारणी यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी करून तालुक्यातील केमिस्ट बांधवांना धीर देऊन त्यांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. सदर नुकसानीची माहिती सर्वांचे आधारस्तंभ आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन मदत करण्याची सूचना देण्यात आली
आणि त्याप्रमाणे आपल्या १५ केमिस्ट बांधवांना चांगल्या कंपनीचा कॉम्प्युटर आणि फ्रीज आ . जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून वाटप करण्यात आले
तसेच या कामाबाबत महाराष्ट्र राज्य केमिस्ट असो चे मदनभाऊ पाटील , दत्तप्रसाद टोपे, बच्चूशेठ ओसवाल आणि पुणे जिल्हा केमिस्ट असो चे अध्यक्ष सुशील तात्या शहा आणि कार्यक्षम सचिव अनिल भाऊ बेलकर या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याकरिता इंदापूर तालुका केमिस्ट असो. च्या वतीने सर्वांचे शतशः आभार मानतो आणि असेच प्रेम कायम इंदापूर तालुक्यावरती राहावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
पुराने नुकसान झालेल्या मेडिकल व्यवसायिकांना मदत मिळाल्याने त्यांना आधार मिळाल्याचे समाधान दिसून आले.

