shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना केंद्र शासनाचा "कोविड वुमन वाॅरीयर"हा पुरस्कार..!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई :- कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुळच्या शेवगाव जि.अहमदनगर येथील असलेल्या बेधडक सोलापूरच्या पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते,औरंगाबादच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील,अमरावती पोलिस आयुक्त आरती सिंह,मुंबई पोलिस उपायुक्त नियती ठाकर दवे यांना दिल्ली येथे राष्ट्रीय महीला आयोगाच्यावतीने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मान्यवरांच्या हस्ते 'कोविड वुमन वाॅरीयर'हा सन्मान देण्यात आला.

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते  मुळच्या अहमदनगर जिल्हातील शेवगावच्या येथील आहेत.तसेच त्यांचे सासर नेवासा तालुक्यातील चांदा आहे.पोलिस सेवेत महिला असताना कोरोना काळात केलेल्या सुरक्षेच्या उपाययोजना मुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारा बद्दल त्यांचे शेवगाव व नेवासा तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.

या पुरस्कारा बद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या हा पुरस्कार सर्व पोलिस दलात काम करत असलेल्या बांधवाना समर्पित करत आहे. कोरोना काळात अंत्यत काटेकोरपणे काम करत जनतेच्या सुरक्षेसाठी लाॅकडाऊनचे काटेकोर नियोजन करून परिसात स्वच्छता ठेवण्याचे काम केले असल्याचे त्या म्हणाल्या.
 मा.तेजस्वी सातपुते-पोलिस अधिक्षक सोलापूर.
close