रेखा जरे पाटील हत्याकांड..!!
अहमदनगर- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड बाळ बोठेला दिलासा मिळणे कठीण झाले असून बोठेचा अटकपूर्व जामिन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना हत्येनंतर दोन दिवसांत पोलिसांनी जेरबंद केले होतेे. यानंतर मात्र हत्येचा मास्टरमाईंड बाळ ज. बोठे अद्याप पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत आहे. या आधी बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवार दि.१जानेवारी २०२१ रोजी सुनावणी होवून खंडपीठाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे.
फरार बोठेला शोधण्यासाठी स्टॅडिंग वॉरंट जारी करूनही पोलिसांना बोठेला पकडण्यासाठी यश आले नाही. बोठेच्या मागावर राज्यातील सर्वच पोलिस आहेत. तरीही पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी होत आहे. बोठेला लवकरात लवकर गजाआड करण्याचे पोलिसांसोर मोठे आव्हान उभे आहे.आता बोठे सुप्रीम कोर्टात जातात की पोलिसांना शरण येतात याकडे सर्वानचे लक्ष आहे.

