नगर । प्रतिनिधी(शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील सर्व गावांतील विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचा निर्णय महावितरण वीज कंपनीने घेतलेला आहे, बंद करण्याचे कारण थकीत विज बिल आहे.
थकीत विज बिल शेतकरी हप्त्या हप्ता ने भरण्यास तयार आहे.विजट्रान्सफार्म बंद करण्याचा निर्णय अन्यकारक आह.या निर्णयाचा पुनर्विचार करावा.गेले नऊ दहा महिन्यांपासून कोरोना काळात कोणता हि शेत माल विकला गेला नाही. जो पिकला तो शेती माल कवडीमोल भावाने विकला जातो आहे.निसर्ग आधुन मधुन प्रकोप करत आहे.
आपण त्यात विद्युत ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे . कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात. सध्या उभी असलेली पिके हात तोंडाशी आलेला गहू, हरभरा , ज्वारी पिंक पाण्या वाचुन जळण्याच्या मार्गावर आहे या पिकाला शेवटचे एक दोन पाण्याची देण्याची खुप गरजेचे आहे. जर हे पाणी मिळाले तरच पिक हाता येतील नाही तर ते पाण्या वाचुन जळुन जाईल.
नाहितर हयव जाईल देव जाईल अशी परिस्थिती शेतकरी बांधवांची झाली आहे तरी आपण आपल्या महावितरण वीज कंपनीने विज बिल वसुली धोरण थोडेसे सवलत देऊन शेतकरीर्याना सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे.विज ट्रान्सफॉर्मर बंद विरोधात प्रहार संघटने महावितरणन कंपनीला निवेदन द्वारे ईशारा दिला आहे.
या निवेदनावर योग्य ती कार्यवाही न झाल्यास दहा दिवसात नंतर महावितरण कार्यालया समोर प्रखर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रहार तालुका अध्यक्ष प्रविण पिंपळे, शाखाअध्यक्ष गणेश कोतकर सलमान पठाण,हर्षद थोरे, गणेश जाधव,अजिनाथ गोधळे,राजु भोसले, कार्तिक शेलार,. हनुमान कोतकर, दादासाहेब हराळ, मोहन पिंपळे आदि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

