अहमदनगर दि. 29 :- केंद्र शासनामार्फत दरवर्षी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधुन नारी शक्ती पुरस्कार प्रदान केले जातात. राष्ट्रासाठी कामगिरी करणा-या महिला,संस्था तसेच समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन अशा महिला, संस्था यांना हापुरस्कार प्रदान केला जातो.
अशा महिला,स्वयंसेवी संस्था यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने अहमदनगर जिल्हयातील नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रासह केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचेwww.narishaktipuraskar.wcd.gov.inआणि www.wcd.nic.in या वेबसाईटवर दिनांक 30 जानेवारी, 2021 पर्यंत सादर करावेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, पहिलामजला, अर्पित हाऊस, श्री. संजय जव्हेरी यांची इमारत, सर्जेपुरा, अहमदनगर. दूरध्वनी क्रमांक 0241- 2431171 वर संपर्क साधावा, असेजिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. जी. पाटील यांनी कळविले आहे.

