क्रिकेट पंच ऋषिकेश विघावे सन्मानीत..!!
श्रीरामपूर : - येथील तरुण तडफदार क्रिकेट पंच ऋषिकेश विघावे यांचा मानवता जिवन कल्याण संस्था व पोलिस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने झालेल्या एका समारंभात विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील स्वयंवर मंगल कार्यालयात श्रीरामपूरचे आमदार लहूजी कानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात क्रिकेट पंच ऋषिकेश विघावे यांना अमहदनगर जिल्हयाचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षका दिपाली काळे मॅडम, श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, रयत शिक्षण संस्थेच्या संचालिका मिनाताई जगधने, डॉ. प्रेरणा शिंदे , अनिल साळवे सर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
ऋषिकेश विघावे यांनी आपल्या अचूक व निपक्षप:ती पंचगिरीने अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. ऋषिकेश विघावे यांनी वडिल डॉ. दत्ता विघावे यांच्या सोबत सलग ३२ मान्यताप्राप्त अधिकृत सामन्यात पंचगिरी करुन विश्वविक्रम नोंदविला आहे. ऋषिकेश विघावे यांच्या या शानदार कामगिरीचे कौतुक म्हणून मानवता जीवन कल्याण संस्थेने विशेष स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले.

