इंदापूर येथे भाजपचे शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात आंदोलन..!!
फोटो:- इंदापूर येथे भाजपने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.
इंदापूर:प्रतिनिधी (दि.१ फेब्रु.२१)
इंदापूर येथे महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर सोमवार (दि.१) भाजपा व मित्र पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन केले. शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज कनेक्शन तोडू दिले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांनी सरकारला दिला.
भाजपचे नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली महावितरणच्या कार्यालयासमोर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची व घरगुती ग्राहकांची वीज तोडणी मोहीम थांबवावी, या मागणीसाठी भाजप व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.
महाआघाडीचे सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. जर वीज कनेक्शन तोडण्यासाठी महावितरणचा कर्मचारी आला तर त्यांना गुलाबाचे फुल देऊन माघारी पाठवा,असे आवाहन भाषणात मयूरसिंह पाटील यांनी केले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार म्हणाले ,' हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज याठिकाणी भाजपा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), रयत क्रांती संघटना व मित्र पक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शन तोडणी मोहिमेच्या विरोधात हे आंदोलन असून जर महावितरणने वीज तोडणी मोहीम थांबली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल. राज्यमंत्र्यांनी तालुक्यातील वीज कनेक्शनची तोडणी व सक्तीची वसुली बंद करावी,असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे निलेश देवकर, रिपब्लिकन पार्टीचे शिवाजी मखरे, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड. कृष्णाजी यादव, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सचिव तानाजी थोरात, भाजपा किसान मोर्चाचे माऊली चवरे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, युवराज मस्के यांची भाषणे झाली.
यावेळी नंदकुमार सोनवणे,प्रदीप पाटील, धनंजय पाटील, अंकुश पाडुळे, रामकृष्ण मोरे गजानन जगताप, दत्तू सवाशे, सत्यशील पाटील, राजेंद्र चोरमले, मोहन दुधाळ, गजानन वाकसे, अशोक वणवे, महेंद्र रेडके, नितीन माने, माऊली बनकर, रघुनाथ राऊत, रवींद्र पाटील, किशोर पवार, शिवाजी तरंगे, कैलास कदम, मानसिंग जगताप, रामकृष्ण मोरे, संग्रामसिंह निंबाळकर, सुभाष भोसले, गोरख शिंदे, माऊली बनकर, मेघशाम पाटील, पिंटू काळे, बाळासाहेब मोरे, निवृत्ती गायकवाड, बाळासाहेब पानसरे, सुभाष काळे, शरद काळे, पांडुरंग शिंदे, संदिपान कडवळे, अविनाश कोथमिरे, तानाजी नाईक, गोरख आदलिंग,शितलताई साबळे, अमोल इंगळे, जगदीश मोहिते, दादा पिसे, हर्षवर्धन कांबळे , बबलू निंबाळकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन भाजपचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी केले. यावेळी सहाय्यक अभियंता रघुनाथ गोफणे यांनी निवेदन स्वीकारले.

