राजवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन नीरा भीमा कारखान्यावरती वृक्षारोपण..!!
फोटो :- नीरा भीमावरती राजवर्धनदादा पाटील यांच्या अभिष्टचिंतन वृक्षारोपण करण्यात आले.
इंदापूर प्रतिनिधी: (दि१ फेब्रु.)
शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्यावरती कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धनदादा हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन ना निमित्त आज सोमवारी (दि.१) वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील व मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकारच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

