shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यांमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असताना पाच वर्षांमध्ये शेतीपंपाची एकदाही वीज तोडली नाही-भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार..!!

राज्यांमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असताना पाच वर्षांमध्ये   शेतीपंपाची एकदाही वीज तोडली नाही-भाजप तालुकाध्यक्ष शरद जामदार..!!
इंदापूर प्रतिनिधी :(दि. १६ फेब्रु.२१)
           इंदापूरचे लोकप्रतिनिधी असलेल्या राज्यमंत्र्याच्या आदेशावरून इंदापूर तालुक्यात  शेती पंपाची वीज तोडण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या वीज तोडणी मोहिमेमुळे तालुक्यातील शेतीच्या होत असलेल्या नुकसानीस राज्यमंत्री हेच जबाबदार आहेत,अशी टीका इंदापूर तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी सोमवारी (दि.१५) केली.
         राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे सध्या सुरु असलेल्या वीज तोडणी मोहिमे बद्दल एक चकार शब्दही बोलण्यास तयार नाहीत,अशी टीकाही यावेळी जामदार यांनी केली आहे.
                कोरोनाची पार्श्वभूमी,अतिवृष्टीचे यामुळे शेतकरी संकटात असताना राज्य मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम राबविण्याचा अतिशय चुकीचा निर्णय घेतला आहे. इंदापूर तालुक्यातील उजनी पाणलोट क्षेत्र, भीमा व नीरा नदी वरील बंधारे, विहिरी, विंधन विहिरी यांना पाणी असूनही शासनाने वीज तोडणी सुरु केल्याने शेतातील उभी पिके करपून चालली आहेत, परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेला राज्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान दिसत नाही का? असा सवालही जामदार यांनी केला.
       शेतीपंपासाठी महावितरणे मोठ्या प्रमाणावरती वीज आकारणी केल्याने भरमसाठ रक्कमेची वीजबिले शेतकऱ्यांना आली आहेत. अवाढव्य वीज बिले आल्याने सध्याच्या आर्थिक अडचणीत जमा करणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. इंदापूर येथे महावितरणच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी वीज तोडू नये म्हणून दोन वेळा आंदोलन केले आहे. जर वीज जोडली पूर्ववत केली नाही तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्त्यावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशाराही भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी दिला आहे.
 
  *भाजप सरकारने एकदाही वीज तोडली नाही* 
  
राज्यांमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर असताना पाच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची सरकारने एकदाही वीज तोडली नाही. उलट शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून कृषी संजीवनी योजना राबवली, अशी माहिती यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी दिली.
close