इंदापूर प्रतिनिधी: (१६ फेब्रु.२१)बाभूळगाव या ठिकाणी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतन निमित्त युवानेते अमोलराजे इंगळे यांच्या वतीने गावातील गरजूंना सामाजिक उपक्रमातून ब्लँकेट वाटप करून उपस्थित गावातील जेष्ठ मान्यवरांचा सत्कार व राजवर्धन पाटील यांच्या हस्ते केक कापण्याचा(दि.१२) कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक कल्याण गुरगुडे, कर्मयोगी कारखान्याचे संचालक भास्कर गुरगुडे ,माजी चेअरमन पोपट भोसले, हलगी सम्राट विठ्ठल मोरे, तात्यासाहेब देवकर, सोमनाथ जावळे, दादा यादव, भारत यादव, गजेंद्र मोरे ,अर्जुन चितारे, रामभाऊ गुजर इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी भास्कर गुरगुडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की,राजवर्धन पाटील यांनी लोकांमध्ये मिसळून समरस होऊन कार्य चालू केले आहे तरुणांमध्ये व तालुक्यातील जनतेच्या सर्व सुख दुखाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन हर्षवर्धन पाटील यांच्या सहभागाची कार्य त्यांचे पुत्र राजवर्धन पाटील करीत आहेत.
तसेच युवा नेते अमोलराजे इंगळे आपल्या भाषणातून आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आमचे मार्गदर्शक आणि इंदापूर तालुक्याचा बुलंद आवाज यांचा १ फेब्रुवारी रोजी अभिष्टचिंतन सोहळा झालेला होता. त्यांच्या वेळे अभावी हा कार्यक्रम उशिरा घेण्यात आला आज त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमास आमच्या गावात भेट दिली त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये बाभुळगाचे नऊ पैकी नऊ सदस्य येण्यामागे गावातील सर्व ग्रामस्थ आणि गावातील अडीअडचणी असतील त्यावर ती उपाययोजना करण्याचे कार्य माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील ,राजवर्धन पाटील यांनी वेळोवेळी केल्याचे दिसून आले. राजवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्यातील जनतेमध्ये मिळून-मिसळून अनेक ठिकाणी भेटत आहेत. अक्षरशा इंदापूर तालुका पिंजून काढला आहे. हे आपणा सर्वांना सांगण्याची गरज नाही. कारण रोज आपण सोशल मीडियावर पहात असता. विरोधकांच्या आधीच राजवर्धन पाटील तालुक्यातील सुख दुःखात सहभाग घेतात. तालुक्यातील युवकांन बरोबर सहभागी होऊन नवीन ऊर्जा देण्याचे कार्य युवकांमध्ये करीत आहेत. आज तालुक्यातील ज्येष्ठांकडे जाण्यास मागेपुढे पाहत असणारे युवक राजवर्धन पाटील यांच्याकडे आपली कामे, अडीअडचणी सांगत आहेत. ज्या ठिकाणी कामे होत असतात .त्या ठिकाणी काम ताबडतोब करणारे राजवर्धन पाटील आहेत. ज्या ठिकाणी कामे होत नाहीत त्या ठिकाणी प्रयत्न करू, पण ते काम होईल की नाही याची शाश्वती स्पष्ट शब्दात देतात .
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्व जेष्ठ व मार्गदर्शक आणि पत्रकार बांधव यांनी माझ्या शब्दाला मान देत या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली हे माझे सौभाग्य समजून मी सर्वांचे आभार मानतो. अशा शब्दात इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
नेता कसा असावा, जो आपल्या अडीअडचणीत, सुख-दुःखात कार्यकर्त्यांची रात्री अपरात्री केव्हाही सांगेल तेव्हा कामे करणारा नेता असावा. अशा नेत्याचा मान सन्मान जो कार्यकर्ता करतो. तोच निष्ठावंत कार्यकर्ता असावा. आज अमोलराजे इंगळे यांनी राजवर्धन पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा यानिमित्त गरजू लोकांना ब्लँकेट वाटपाचे आयोजन करून एक सामाजिक उपक्रमातून हा सोहळा साजरा केला. त्याचे विशेष कौतुक उपस्थित ग्रामस्थांच्या चर्चेतून दिसून येत होता.

