shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतीय चलनातील दहा रुपये ‌नाणे नाकारणे देशद्रोहाचा गुन्हा...!


नगर । प्रतिनिधी : (शिवा म्हस्के) :दि.15
नगर तालुक्यात अनेक ठिकाणी भारतीय चलनातील दहा रुपयांचे नाणे स्विकारले जात नाही‌.
गावातील बाजारपेठा मध्ये सरास दहा रुपये नाणे नाकारले जात आहे.  दैनंदिन व्यवहारासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) नाण्यांची निर्मिती केली. मात्र, वजन अधिक असल्याने नाणे चलनातून बाद झाल्याची अफवा काही बँक कर्मचारी, नागरिक, दुकानदार, व्यापाऱ्यांकडून पसरविली जात आहे. पाच किंवा दहा रुपयांचे चलनी नाणे व्यवहारातून बाद झालेले नाही. सामान्यांची अशी दिशाभूल करणाऱ्यांवर थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच नोटांप्रमाणे नाण्यांना नागरिकांसह व्यावसायिकांनी स्वीकार करावा, असे भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) स्पष्ट केले आहे.                           नाणे दहाचे

तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब या प्रकरणी लक्ष घालून दैनिक वृत्तपत्र माध्यमातून जनजागृती केली होती.संबधीत बँकांना आदेश हि दिले होते
पण या गोष्टी चा विसर पडला आहे. दहा रुपये ‌नाणे नाकारणे हे गैरसमजा मुळे पण काही ठिकाणी घडत आहे. नाणे चलनातून बाद झाले,होणार या प्रकराणे असे प्रकार घडत आहेत.तरी आथिर्क व्यवहारात दहा नाणं स्विकारणे गरजेचे आहे.

 *मी पुण्यातुन गावी आलो असता माझ्याकडे भारतीय चलनातील दहा रुपये दोन तीन नाणे होतं ते नगर याठिकाणी कुठे चालले नाही.तसेच मी माझ्या दहि गाव या गावी आलो या ठिकाणी दुकानात कुठे चालले नाही.पुण्यात देहाचे नाणे चालते नगर मध्ये नाही हे ऐकून आश्चर्य वाटले.या दहा रुपये नाण्यांवरून एक दोन ठिकाणी किरकोळ हुज्जत हि झाली पण दहाचे नाणे कुठे हि स्विकारले गेले नाही.*

 जागृत ग्राहक
 जमिर समशेर बेग

बँकांनी नाणी स्वीकारणे बंद केल्याचा अनुभव नागरिकांनी सांगितला. मुख्यत: चिल्लर सांभाळणे कठीण झाल्याने अनेक बँक नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत.

कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेने चलनात असलेले प्रत्येक नाणे व नोटा स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेने अशा प्रकारचे नाण्याचे चलन नाकारू नये; अन्यथा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
close