shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यातील मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर खडक पोलिसांनी अटक..

पुणे:-पुण्यातील मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईत चोरट्याला अखेर खडक पोलिसांनी अटक केली. चार जानेवारीला त्याने भूमापन कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

आकाश उर्फ झुरळ्या विठ्ठल पाटोळे (वय 24, रा. काशेवाडी भवानी पेठ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत चोरटा असून त्याच्या विरोधात चोरीच्या 16 गुन्ह्याची नोंद आहे.

मामलेदार कचेरीतून झालेल्या चोरी प्रकरणाचा तपास खडक पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत होते. यावेळी त्यांना ही चोरी आकाश उर्फ झुरळ्या याने केली असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी झुरळ्याला त्याच्या भवानी पेठेतील घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने मामलेदार कचेरीत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. याशिवाय त्याने शुक्रवार पेठ आणि टिंबर मार्केटमध्येही घरफोडी केल्याची कबुली दिली. या घरफोडीतील रोख 15,200 रुपये आणि दोन चांदीचे कॉईन पोलिसांनी जप्त केले आहेत.

आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्यांनी यापूर्वीही खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 तर समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन असे सोळा घरफोडीचे गुन्हे केले आहेत. यातील तीन घरफोडीच्या गुन्ह्यात त्याला एक वर्षाची शिक्षा ही झाली आहे.
close