इंदापूर येथे चंद्रकांत लांडगे यांच्या नापास कट्टा वेब सिरीज पर्व दुसरे च्या चित्रीकरणास शुभारंभ..!!
इंदापूर प्रतिनिधी: (दि.७ फेब्रु.२१) इंदापूर येथे डॉक्टर कदम हॉस्पिटल शेजारी
प्रियतमा प्रोडक्शन निर्मित नापास कट्टा पर्व दुसरे या मराठी वेब सीरिजच्या चित्रीकरण करण्याचे उद्घाटन कमल लांडगे यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी केले. पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनीही या वेब सिरीजचे उद्घाटन केले, युवा नेते महेंद्र रेडके, युवा नेते अमोलराजे इंगळे, सामाजिक कार्यकर्ते राहुल गुंडेकर,डॉक्टर कदम, नवनाथ गायकवाड, चैतन्य सुडे. रवी विटकर, विजय पाटील, तुषार गांधी, अमोल कारंडे, एडवोकेट आनंद केकान, राम पवार दीपक रायकर व सर्व कलाकार उपस्थित होते.
नापास कट्टा या मराठी वेब सिरीज चे निर्माते चंद्रकांत लांडगे, कमल लांडगे. दिग्दर्शक विकी कांबळे, कथा पटकथा संवाद समीर पठाण, छायांकन प्रकाश तेलग ,सागर कांबळे. संकलन चंद्रकांत लांडगे, प्रकाश तेलग. प्रोडक्शन हेड विशाल लांडगे. यांनी केले आहे.
यावेळी नापास कट्टा या वेब सिरीज चे सर्वेसर्वा चंद्रकांत लांडगे यांनी म्हटले की या वेब सिरीज मध्ये बारावी नापास झालेली मुले कसे राजकारणाकडे ओढली जातात .काही मुले अभ्यास करून पास होण्याच्या तयारीला लागतात. तर काही गावातील पुढारी यांच्या राजकारणात गुंतण्या च्या वाटेवर असतात. पण एक लक्षात असते की, आपण परत बारावी पास होणार .अशा प्रकारे वेब सिरीज मधून अनेक पद्धतीने जनतेचे मनोरंजन करणारी व नवीन पिढीला प्रबोधनात्मक संदेश देणारी या वेब सिरिजची सुरुवात आज करण्यात आली आहे.
या वेब सिरी च्या दुसऱ्या पर्वाला व त्यातील सर्व कलाकारांना अंकिता ताई पाटील, युवा नेते महेंद्र रेडके, युवा नेते अमोलराजे इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

