श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तीर्थ क्षेत्रास पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी निधी मंजूर ..
अंकिता पाटील यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे मानले आभार..!!
इंदापूर प्रतिनिधी:श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी पर्यटन विभागामार्फत २८.४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
जिल्हा परिषद सदस्या कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील विकास कामांसाठी निधी मिळावा याकरिता आदित्य ठाकरे यांना विनंती केली होती.
अंकिता पाटील यांच्या बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद मतदारसंघातील श्रीक्षेत्र निरा नरसिंहपुर हे राज्यातील एक महत्त्वाचे व प्राचीन तीर्थ तीर्थ क्षेत्र आहे. निरा भीमा नदीच्या संगमावर वसलेले हे तीर्थक्षेत्र असून पर्यटनाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने व श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात येणाऱ्या भाविक व पर्यटक त्यांच्या सोयीसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्यास येणाऱ्या भाविक व पर्यटकांची संख्याही वाढेल व परिसरातील अवलंबून असलेल्या व्यवसाय उद्योगालाही चालना मिळेल. याकरिता अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पर्यटन खात्यामार्फत श्री क्षेत्र निरा नरसिंहपूर ता. इंदापूर जि. पुणे च्या विविध विकास कामांसाठी निधी मिळावा याकरिता मागणी केली होती.
अंकिता पाटील यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून काल राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर साठी २८.४८ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागाच्या मार्फत मंजूर केला आहे.

