प्रतिनिधी-विशाल लोंढे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रमाई च्या त्यागामुळे शिक्षण पूर्ण करता आले. शोषित समाजासाठी काम करता आले. रमाईच्या त्यागाला विश्वात तोड नाही. स्वत: बाबासाहेबांनीही रमाईचा त्याग खुल्या मनाने मान्य केला होता. रमाईचे कष्ट सध्याच्या महिलांनी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी पोलीस अधीक्षक के.पी.रोकडे यांनी केले.
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या कार्यस्थळावरील डॉ . बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के. पी. रोकडे प्रमुख पाहुणे म्हूणन उपस्तित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी रमाबाईंच्या फोटो ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईच्या सहकार्यामुळेच समाजाचा उद्धार केला. रमाई ह्या सावली प्रमाणे बाबासाहेबांच्या सोबत होत्या. म्हणूनच बाबासाहेबांनी समता, बंधुता, न्याय, स्वतंत्र, समाजाची रचना केली, त्यात रमाई चा मोलाचा वाट आहे,असं प्रतिपादन उद्यान समितीचे सचिव अरुण लोंढे यांनी केले.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीचे राहुल बनकर, कैलास पवार,पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, शुभम नांगरे, सुरेंद्र गडवे,अविनाश भालेराव, महेंद्र खंडांगळे, भूषण साळवे, सोनू कदम, किरण पोळ आदी उपस्थित होते.

