shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चाकण तळेगाव कंपनीतील कामगाराला अडवून लुटणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात..!


पुणे:-कंपनीतील कामाची वेळ संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात असलेल्या एका कामगाराला सहा जणांनी अडवून लुटल्याची घटना घडली होती. त्यातील सहा आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे.

रवी दादू ठाकर (वय 24), योगेश नाथु मेंगाळ (वय 23), धनेश फकीर ठाकर (वय 22), लक्ष्मण कैलास मेंगाळ (वय 20), निखिल सखाराम मेंगाळ (वय 25, सर्व रा. ठाकरवस्ती, रासे, ता. खेड), समीर भिकाजी जाधव (वय 26, रा. ठाकरवस्ती, रेटवडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता फिर्यादी अनिल मारुतराव शिंगणापूरे खराबवाडी येथील एका कंपनीतून कामाची वेळ संपल्यानंतर दुचाकीवरून घरी जात होते. चाकण तळेगाव रोडवर त्यांना सहा जणांनी अडवले. शिंगणापुरे यांच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 15 हजार 150 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

याबाबत शिंगणापुरे यांनी म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल केला. म्हाळुंगे पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु केला. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांनतर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या आणखी तीन साथीदारांना अटक केली.

ही कारवाई पोलीस म्हाळुंगे चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार, युनिट तीनचे पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सारंग चव्हाण, उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार तात्या टोपे, मधुकर पानसरे, प्रकाश नवले, ज्ञानदेव आटोळे, श्रीधन इचके, किरण सांगळे, कोळेकर, ढाकणे, नांगरे यांच्या पथकाने केली आहे.
close