shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श शैक्षणिक समूहाचे धनराज विसपुते खा.सुप्रिया सुळे यांच्या हस्ते यशवंत सन्मान पुरस्कार- २०२१ने सन्मानित ...!


राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी:-दि.१९/२/२१ शुक्रवार रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान केंद्रातर्फे, 
" यशवंत सन्मान पुरस्कार २०२१ " पुरस्काराचे आयोजन जेष्ठ नागरिक भवन नेरुळ (प.)नवी मुंबई येथे करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मा.खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, मा. नामदार दिलीप वळसे पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नवी मुंबईचे अध्यक्ष मा. श्री.प्रमोदजी कर्नाड  प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थितीत होते.

सदर कार्यक्रमात  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नेरुळ,नवी मुंबईतर्फे दिला जाणारा "यशवंत सन्मान पुरस्कार २०२१ " पुरस्कार हा प्रमुख पाहुणे मा.खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, मा. नामदार दिलीप वळसे पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यशवंतराव प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोदजी कर्नाड  यांच्या शुभहस्ते आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन दादासाहेब मा.श्री.धनराजजी विसपुते, संचालिका मा.सौ.संगिता विसपुते व संस्थेचे विश्वस्त व प्राचार्य यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन दादासाहेब धनराजजी विसपुते म्हणाले कि,सदर पुरस्कार हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची प्रेरणा देणारा आहे .त्यांचे विचार आदर्श शैक्षणिक समूह जनमानसात रूजविण्याचा प्रयत्न करेल.आदर्श शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील आपला एक वेगळा ठसा उमटविलेला आहे.सदर पुरस्कार हा आदर्श शैक्षणिक समूहाच्या कार्याचा गौरव आहे.

 या कार्यक्रम प्रसंगी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
close