shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय युवा वाहिनी दिव्यांग प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रकाश दरंदले...!!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई : राष्ट्रीय युवा वाहिनी दिव्यांग प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्रकाश आण्णासाहेब पा दरंदले (बी. एस्सी) यांची  संघटना  संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष देव प्रकाश शुक्ला यांनी  केली आहे. प्रकाश  दरंदले यांनी आतापर्यंत पर्यंत दिव्यांगाच्या साठी गेल्या दहा वर्षा पासून काम करीत आहेत.  

पंचायत समिती मार्फत दिव्यांगाना तिन चाकी सायकल वाटप, दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना अनेक दिव्यांगाना लाभ दिला आहे. दिव्यांग असूनही सतत तिन चाकी सायकल वरून घरघर येऊन दिव्यांगाना दिव्यांग योजनाचे लाभ दिला आहे.  ग्रामपंचायत 5% निधी दिव्यांगाना लाभ दिला आहे. दिव्यांग विवाह वधूवर आयोजन करणे. दिव्यांग मेळावा घेऊन दिव्यांगाना सर्व योजना माहिती दिली जाती. मोफत नाव नोंदणी आणि मार्गदर्शन केले जाते. जिल्हा परिषद मार्फत विविध योजनां राबिवल्या जातात. 

राष्ट्रीय युवा वाहिनी दिव्यांग प्रकोष्ठ मार्फत दिव्यांगाना सर्व योजनेचा लाभ दिला जाईल तसेच सर्व योजना ग्रामीण भागात पर्यंत पोहोचल्या जातील.  आतापर्यंत दिव्यांग योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. दिव्यांग संघटना मार्फत ग्रामपंचायत 5% निधी वाटप करणे. घरकुल योजना राबिवणे.  संजय गांधी निराधार योजना राबिवणे.  सर्व दिव्यांगानच्या सोयी आणि सवलती ग्रामीण भागात पर्यंत पोहचणे. गावोगावी तसेच महाराष्ट्र भर दौरे करू. तसेच योजना राबवू ,

अजून या क्षेत्रात अजून काय नविन करण्यात याची अभ्यास करून. बचत गट तयार करून दिव्यांगानचे जीवनमान उंचावत प्रयत्न करू व दिव्यांगानी सुध्दा विविध कल्पना आणि संघटना विषयी आपल्या कल्पना मांडाव्यात असे दरंदले यांनी सांगितले.

आतापर्यंत दहा वर्षात मुंबई आझाद मैदानावर संजय गांधी निराधार योजनेत पैसे वाढवण्यासाठी मोर्चे काढले. मंत्रालयात निवेदन दिले.  विविध मागण्या साठी जिल्हा परिषद समोर उपोषण केले. जिल्हा रुग्णालयात येथे दिव्यांगानच्या साठी उपोषण केले.  दिव्यांग योजना साठी पंचायत समितीला वेळोवेळी निवेदन दिले.  विविध योजना साठी मंत्रालय आणि केंद्र शासन यांनी दिव्यांग योजना साठी पाठपुरावा केला जाईल.  

तसेच महाराष्ट्र शासन आणि केंद शासन विविध योजना एकत्रित करून माहीती येऊन दिव्यांगानच्या पर्यंत पोहोचली तसेच ग्रामीण भागात पर्यंत राहिल्या  जातील असे नवनियुक्त राज्य अध्यक्ष  प्रकाश आण्णासाहेब पा दरंदले यांनी सांगितले.
close