shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जगातील सर्वात मोठया क्रिकेट स्टेडीयमची कहाणी..!!

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा व चौथा सामना जगातील सर्वात जास्त प्रेक्षक क्षमता असलेल्या सरदार पटेल स्टेडीयमवर होणार असून तिसरा कसोटी सामना २४ फेब्रुवारीपासून खेळविण्यात येणार आहे. हा कसोटी डे नाईट असेल तर त्यानंतरचा कसोटी सुर्याच्या प्रकाशात खेळविण्यात येणार आहे. अशा या ऐतिहासिक मैदानाविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ या.

      
            
सरदार पटेल स्टेडीयम भारताच्या गुजरात या राज्यातील अहमदाबाद जिल्हयातील मोटेरा या गावात बनविण्यात आले असून या महाकाय स्टेडीयमचे आर्कीटेक्ट शशि प्रभू हे आहेत. ६३ एकर क्षेत्रात उभारण्यात आलेल्या या स्टेडियमचे निर्माण कार्य लार्सन अँड टुब्रो या कंपनीद्वारे करण्यात आले असून हे  भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे स्टेडीयम ठरले असून या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता १ लाख दहा हजार इतकी आहे. याच बरोबर येथील पार्कींग मध्ये एकाचवळी ४००० कार व ३००० दुचाकी वाहने उभी केली जाऊ शकतात. या स्टेडीयममध्ये एकाच वेळी चार संघासाठी सर्व सुविधा असलेले चार अत्याधुनिक ड्रेसिंग रूमही आहेत. या स्टेडियमचे विशेष वैशिष्टये म्हणजे येथे जर सामन्या दरम्यान पाऊस झाला तर मैदान केवळ अर्ध्या तासात खेळण्यायोग्य बनविले जाऊ शकते. २४ फेब्रुवारी २०२० रोजी 'नमस्ते इंडिया' या कार्यक्रमाचे आयोजन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन स्टेडियमचे उदघाटन केले होते. 

                           
या स्टेडीयमची मुळ निर्मिती सन १९८२ मध्ये करण्यात आली असून सन २०१५ मध्ये ते पाडून तेथेच नवीन स्टेडीयमची पुनर्बांधणी सन २०२० मध्ये पूर्ण करण्यात आली. पूर्वीच्या मैदानाची आसन क्षमता ५१००० इतकी होती. हे स्टेडीयम गुजरात क्रिकेट असोशिएशनच्या मालकीचे असून त्याच्या निर्मीती साठी ८०० कोटी रूपये खर्च आला आहे.बीसीसीआयचे सचिव जयेश शहा हे गुजरात क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष आहेत.

                               
या मैदानावर ऑस्ट्रेलियन जातीचे गवत उगविले असून त्याच्यामुळे मैदानाच्या सौंदर्यात भर पडली आहे. मोटेरा स्टेडीयम म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या या मैदानाच्या गोलंदाजी टाकण्याच्या दोन्ही टोकांचे नावे अदानी पॅव्हेलियन एंड व जीएमडीसी एंड असे आह.  

                        
या नवीन स्टेडीममचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या मैदानाच्या मधोमध अकरा खेळपट्ट्या बनविण्यात आल्या आहेत. तर सुसज्ज जीमही बनविण्यात आले आहेत. येथे बसविलेल्या एलईडी फ्लड लाईटसमुळे डे नाईट सामन्याच्या वेळी हवेतला चेंडू सर्वांना सहजरित्या बघता येऊ शकेल. मुख्य खेळपट्टया व सरावाच्या खेळपट्टया सारख्याच दर्जाच्या बनविण्यात आल्या असून येथे खेळाडूंना सराव करणे देखील आनंदमय ठरेल. मैदानाच्या गोलाकर छताला एलईडी लाईट्स बसविल्यामुळे स्टेडियमचं स्वरूप रात्रीही उठावदार दिसेल.

                              
सरदार पटेल म्हणजेेच मोटेरा स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना भारत व वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान १२ तेे १६ नोव्हेंबर या कालावधीत खेळविण्यात आला. तर शेवटचाा कसोटी १२ ते १६  नोव्हेंबर २०१२ रोजी भारत व इंग्लंड या संघात खेळला गेला असून आता या नूतन स्टेडियममध्ये उदघाटनानंतर बरोबर एक वर्षाने परत एकदा भारत व इंग्लंड या दोन संघातील  सामन्यानेच नवीन स्टेडियमधील कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा होणार आहे.
                              
सरदार पटेल म्हणजेेच मोटेरा स्टेडीयमवर पहिला कसोटी सामना भारत व वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान १२ तेे १६ नोव्हेंबर या कालावधीत खेळविण्यात आला. तर शेवटचाा कसोटी १२ ते १६  नोव्हेंबर २०१२ रोजी भारत व इंग्लंड या संघात खेळला गेला असून आता या नूतन स्टेडियममध्ये उदघाटनानंतर बरोबर एक वर्षाने परत एकदा भारत व इंग्लंड या दोन संघातील  सामन्यानेच नवीन स्टेडियमधील कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा होणार आहे.
                             
५ ऑक्टोबर १९८४ रोजी या मैदानावर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना खेळविण्यात आला. तर शेवटचा वनडे सामना भारत व श्रीलंकेदरम्यान ६ नोव्हेंबर २०१४मध्ये झाला आहे. तर येथे भारत व पाकिस्तान यांच्या एकमेव टि २० सामना २८ डिसेंबर २०१२ रोजी खेळविला गेला.
                              

या मैदानाची नवनिर्मिती होण्यापूर्वी माहिलांचेही सामने खेळले गेले आहेत. १२ मार्च २०१२ रोजी भारत व ऑस्ट्रेेलिया यांच्या महिला संघात खेळलेला वन डे सामना येथील महिलांचा पहिला सामना होय. तर १२ एप्रिल २०१३ रोजी खेळला गेलेला भारत व बांगलादेश यांच्यातील महिला या मैदानावरील शेवटचा एकदिवसीय सामना खेळल्या. टि २० सामन्यांचा विचार केला तर २२ जानेवारी २०११ रोजी भारत व विंडीज यांच्यातील महिला येथील पहिला टि २० सामना खेळल्या. २४ जानेवारी २०११ रोजी या दोन झालेला टि २० सामना या मैदानावरील महिलांचा शेेवटचा टि-२० सामना ठरला.

 लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close