shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खळबजनक घटनेने माजलगाव तालुका हादरला..!!

दोन बहिणींना मारहाण करून एकीचे केले जबरदस्तीने  अपहरण....!!           
 

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे-                       माजलगाव  तालुक्यातील हरकीलिमगाव येथील व माजलगावातील सुंदरराव सोळंकें महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या दोन बहिणींना हरकीलिमगाव शिवारात एका युवकाने मारहाण करून पैकी एकीला मोटारसायकल वर पळवून नेवून अपहरण केल्याची घटना १७ फेब्रुवारी बुधवार रोजी घडली असुन अपहरत मुलीच्या बहिणीने माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरुन आरोपी अभिषेक गंगाराम निर्सगंध रा.हरकीलिमगाव याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, उपरोक्त नमूद गावातील दोन बहिणी एक बी.ए.तृतीय वर्षे तर दुसरी १२वी.वर्गात अध्ययन करीत आहेत. आणि त्या दोघी १७ फेब्रुवारी बुधवार रोजी महाविद्यालयात प्रात्यक्षिक परिक्षा संपल्यानंतर त्या दुपारी ३:३०वा.दरम्यान रिक्षाने हरकीलिमगाव (माऊली फाटा) येथे उतरून गावाकडे पायी चालत जाताना वाटेतील धनगर मळा जवळ श्रीकिसन शिंदे यांच्या आखाड्या जवळ पाठीमागून अभिषेक निर्सगंध हा मोटारसायकल वर आला. त्याने दोघींना मोटारसायकल वर बसायला सांगितले. यावर दोघीनींही नकार देताच त्याने फिर्यादी  व तीच्या बहिणीच्या गालावर चापटा व कमरेच्या बेल्ट ने मारहाण केली . व १८वर्ष वयाच्या बहिणी ला जबरदस्तीने मोटारसायकल वर बसवून मंगरुळ नं.२ च्या दिशेने निघून गेला.  अश्या आशयाची फिर्याद दिल्याने आरोपी अभिषेक गंगाराम निर्सगंध विरोधात भादंवि.कलम ३२३, ३६३, ३६६प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या जोडप्यांचा तपास पो.उप.नि. सोमनाथ नरके करत आहेत.          

या प्रकारामुळे माजलगाव तालुक्यात खळबळ माजली आहे. व आरोपीला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
close