चाकाटी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी संजय बबन रुपनवर व उपसरपंच पदी सौ शुभांगी अतुल तनपुरे यांची निवड
इंदापूर : ( प्रतिनिधी )
चाकाठी ग्रामपंचायतीच्या आज (दि.१०) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंच पदी संजय बबन रुपनवर व उपसरपंचपदी सौ शुभांगी अतुल तनपुरे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वी.के.शेंडे यांनी जाहीर केले.
चाकाटी ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनलने सात पैकी पाच जागांवर विजय मिळवत, चाकाटी ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. (दि १०) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील संजय बबन रुपनवर ,सौ शुभांगी अतुल तनपुरे यांच्या निवडीमुळे चाकाटी ग्रामस्थ समाधान व्यक्त करताना दिसत होते.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य
घोडके समाधान जनार्दन, सौ मनीषा संजय रुपनवर, सौ.हर्षाली साहेबराव मारकड
गावातील मान्यवर नवनाथ रुपनवर, केशवकाका मारकड, विजय मारकड, गणपत मारकड, सुभाष पाटील, श्यामराव तनपुरे, राजेंद्र बंडगर, पोलीस पाटील भालचंद्र मारकड, लक्ष्मण मरकड, लखन घोडके, उमेश जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वी.के. शेंडे, ग्रामसेवक स्वप्निल गायकवाड यांनी काम पाहिले.
नवनाथ रुपनवर यांनी सरपंच ,उपसरपंच व सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करून जाहीर अभिनंदन केले.

